चांगदेव काळेल
महाराष्ट्र पोलीस न्यूज
सातारा (कोरेगाव) : कोरेगाव वनपरिक्षेत्र कार्यालयात रुजू असणारे महेश सोनावले काही अधिकाऱ्यांशी संगणमत करून गैरप्रकार करीत आहेत. अशा आशयाचे निवेदन सातारा उपवनसंरक्षक यांना युवा सेनेचे शहराध्यक्ष शिवेंद्र बाळासाहेब ताटे यांनी दिली आहे.
तसेच त्यांच्या निवेदनानुसार सातारा वनपरिक्षेत्र हद्दीतील परिसरातून महेश सोनावले आणि त्यांचे साथीदार कर्मचारी शेतकऱ्यांना नाहक त्रास देत पैशाची मागणी करीत आहेत.
महेश सोनावले यांची नियुक्ती कोरेगावला असूनही अधिकाऱ्यांशी संगणमत करून असे गैरप्रकार करीत असल्याचे निवेदन दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सोबतच संगणमत करून शासकीय रोप-वाटिकेमधून बेकायदेशीर रोप विक्री होत असल्याचेही नागरिकांमध्ये चर्चेचा विषय झाला आहे.
वनविभागाच्या शासकीय विश्रामगृहामध्ये मद्यपान, जुगार असे गैर प्रकार सुरू असल्याचेही त्यांनी निवेदनातून म्हंटले आहे.
या कर्मचाऱ्यांच्या दहशतीमुळे तक्रारदार समोर येत नसल्याचेही म्हटले आहे. यापुर्वी महेश सोनावले यांच्यावर खंडणी सारखा गंभीर गुन्हा दाखल असल्याने त्यांची बदली कोरेगावला करण्यात आली होती. असे असताना सुद्धा त्यांची नाममात्रच नियुक्ती करण्यात आली आहे. असे निवेदनातून स्पष्ट होत आहे.
त्यामुळे वनविभागात नेमकं चाललय काय? या निवेदनानंतर वन विभागाचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला असून, वनविभागाच्या या कारभारामुळे वनविभागाची वारंवार नाचक्की, बदनामी होत आहे. असे असताना या गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांना वरिष्ठ अधिकारी वारंवार पाठीशी घालत का असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडत असून वन विभागाचे पाणी नेमकं कुठं कुठं मुरतंय आणि कर्मचारी कुठे कुठे खंडणीची वसुली करत फिरतंय या कर्मचाऱ्यांला नक्की कोणाचा वरदहस्त आहे. यावर शासन काय कारवाई करणार हे ऐणारा काळ ठरवेल.
सदर या प्रकरणी संबधित अधिकारी यांच्याशी फोनवरून संवाद झाला असता त्यांनी असे प्रकार करणाऱ्या वर कडक कारवाई करण्यात येईल अशी तोंडी ग्वाही दिली असून प्रत्यक्ष निवेदनाबाबत कोणताही ठोस दुजोरा दिला नाही. का येणार्या काळात अशीच परिस्थिती राहणार आहे....


إرسال تعليق