शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

देशभक्तीपर समूहगीत; साने गुरुजी संस्थेच्या महादेवनगर शाखेत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा


 सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्युज 


पुणे (हडपसर) : साने गुरुजी शिक्षण संस्थेच्या महादेवनगर येथील एस.एम.जोशी माध्यमिक विद्यालय आदर्श विद्या मंदिर शाखा क्रमांक २, नूतन बालक मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय प्रांगणात भारताचा ७६ वा स्वातंत्र्य दिन संस्थेचे अध्यक्ष आमदार चेतन तुपे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरा करण्यात आला.

          ‌   कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ह्यूमन राइट्स दिल्ली पुणे व्हाईस प्री्सीडेन्ट भारती तुपे होत्या. या कार्यक्रम प्रसंगी डॉ.रोहित गांधी, गजानन साकोरे, नवनाथ साकोरे, अनिल भोसुरे, अविनाश घुले, स्वाती टिळेकर, उमेश मांगले, मृदुला देशपांडे, एकनाथ सपकाळ, डॉ. पटेल, कदम सिस्टर, यांच्यासह साने गुरुजी शिक्षण संस्थेचे सरचिटणीस सुभाष आरोळे, संचालिका उज्ज्वला टिळेकर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

                  विद्यालयाच्या वतीने समूहगीत, देशभक्तीपर नृत्य, गीते यांचे सादरीकरण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस.एम.जोशी विद्यालयाच्या उल्का अडसूळ यांनी केले, स्वागत निवेदन सुवर्णा वाघमारे, बक्षीस वितरण कल्याणी धेंडे, दिपाली थिटे यांनी केले. आभार मुख्याध्यापिका तळेकर यांनी केले. सूत्रसंचालन वैशाली निलाकर यांनी केले.

Post a Comment

أحدث أقدم