दत्तु सुर्यवंशी
महाराष्ट्र पोलीस न्युज
धाराशीव (उमरगा) : दिनांक २९ ऑगस्ट २०२३ रोजी प्रशालेत ISRO मध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झालेले युवा शास्त्रज्ञ धीरज खोंडे यांचा सत्कार.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जेवळी एज्युकेशन सोसायटी जेवळी चे सन्माननीय अध्यक्ष अशोकराव भुसणे पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून शालेय समिती सभापती इराप्पा डिग्गे, सहसचिव प्रा. बसवराज पणुरे, संचालक गौरीशंकर पणुरे, प्राचार्य महादेव चौधरी पर्यवेक्षिका सुरेखा चेंडके, पर्यवेक्षक महादेव भोसले व रोटरी क्लब ऑफ लातूर मधील विजय भाऊ राठी (उद्योजक )डॉक्टर गुणवंत बिराजदार (चेअरमन रोटरी क्लब लातूर )डॉक्टर हुलसुरे, डॉक्टर स्वामी, प्राचार्य प्रवीण खोडे, डॉक्टर शिवराज मोघे, मुख्याध्यापक व्यंकट घोडके हे उपस्थित होते.
उपस्थित सर्व मान्यवरांचे प्रशालेच्या वतीने स्वागत सत्कार करण्यात आला. स्वागत समारंभ नंतर सरस्वती विद्यालय मागणी चे प्राचार्य प्रवीण खोंडे यांचे चिरंजीव युवा शास्त्रज्ञ धीरज खोंडे याचे इस्रो मध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली. अशा युवा शास्त्रज्ञाकडून आपल्या प्रशालेतील विद्यार्थ्यांना स्फूर्ती मिळावी त्याचा आदर्श आपले विद्यार्थी घ्यावे या उद्देशाने युवा शास्त्रज्ञ धीरज खोंडे याला प्रशालेत पाचारण करण्यात आले होते. त्यांनी आपले विद्यार्थ्यांना दहावी बारावीनंतर काय करायचे याचे करियर मंत्र दिले किती वेळ अभ्यास करायचा आमंत्रण वाचनाची आवड कशी निर्माण करून घेतली अशा अनेक गोष्टीबद्दल त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांशी हितगुज केले. रोटरी क्लब लातूर यांच्याकडून आपल्या प्रशालेला सॅनिटरी डिस्पोज इन सेक्टर देण्यात आले. मुलींच्या समस्या आणि त्यातून होणारे रोग याबद्दल डॉक्टर हुलसुरे डॉक्टर स्वामी मार्गदर्शन केले व सॅनिटरी डिस्पोज इन सेक्टर याचा वापर कसा करायचा याबद्दल अधिक माहिती दिली...
त्याच बरोबर जेवळी एज्युकेशन सोसायटी जेवळीच्या सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित जेवळी. मधून (विद्यार्थी कल्याण निधी) जमा करून पाचवी ते बारावीच्या गरीब होतकरू भूमिहीन शेतमजूर निराधार अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.. सर्व शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी, बहुसंख्या विद्यार्थी /विद्यार्थिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर व्ही पाटील तर आभार एस एस धरणे यांनी मांडले...


إرسال تعليق