स्मिता बाबरे (मुख्य संपादक)
महाराष्ट्र पोलीस न्युज
Trivikram Dhol Tasha Pathak Dubai extends its wings to form First International Kids Dhol Tasha Pathak outside India.
मुंबई : त्रिविक्रम ढोल ताशा पथक दुबई हे संपूर्ण आखाती देशात स्थापन झालेले पहिले व एकमेव पारंपारिक ढोल ताशा पथक आहे.
या पथकाची स्थापना सागर पाटील यांनी सन २०१७ मध्ये दुबईत केली. महाराष्ट्राचा आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ढोल ताशा संस्कृतीचा प्रचार या पथकाने आजवर केला व या पथकाला महाराष्ट्र शासनाने खास मराठी भाषा सन्मान देऊन गौरविले आहे.
नुकतेच या पथकाचे १५० प्रयोग पूर्ण झाले असून, ढोल ताशा संस्कृतीचा वारसा नवीन पिढीला सोपवण्यासाठी या पथकाने खास लहान मुलां करिता नविन पथक सुरू केले आहे. त्रिविक्रम बालमित्र ढोल ताशा पथक दुबई असे या पथकाचे नाव असून यामध्ये ६ ते १४ वर्षाच्या मुला- मुलींचा सहभाग असणार आहे.
"परदेशात वाढणाऱ्या या मुलांना आपल्या महाराष्ट्राच्या कला व संस्कृतीची जाणीव असावी व त्याची ओढ लागावी म्हणून या पथकाची स्थापना मी केली", असे पथकाचे संस्थापक सागर पाटील म्हणतात.
या लहान मुलांना ढोल ताशा लेझीम ध्वज झांज या वाद्यांची ओळख करून त्यांना योग्य ते प्रशिक्षण देण्यात आले आहे. १९ सप्टेंबर रोजी अबुधाबी मध्ये झालेल्या महाराष्ट्र मंडळ गणेश उत्सवात ह्या बालमित्र पथकाने सुमारे ८००० गणेश भक्तांच्या समोर सादरीकरण करून प्रेक्षकांचे मन जिंकले. पथकात सध्या १२ कलाकार आहेत व नवीन सभासद नोंदणीला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. पथकाचे नेतृत्व सागर पाटील करत आहेत. पथकामध्ये पुषन पाटील, काव्या सांगले, हेतवी जोशी, ओम व ईश्वरी इरवाडकर, अनय व विनय पाटील, अन्विता सावंत, आदि पाटील, विनंती व साक्षी हसबे, भाग्या गावडे, आरुष कर्वे अशी या बाल मित्रांची नावे आहेत.
. येणाऱ्या काळात त्रिविक्रम् बालमित्रांचेे हे पथक दुबईतील अनेक मोठ्या कार्यक्रमांमध्ये ढोल ताशाचे वादन करून मराठमोळी संस्कृती परदेशात जपण्याच्या कार्यात हातभार लावताना यात शंका नाही.

إرسال تعليق