शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

पोलीस हवालदार कदम यांचा उपचार दरम्यान मृत्यू.


 स्मिता बाबरे (मुख्य संपादक)

महाराष्ट्र पोलीस न्युज 


पुणे (बारामती) : यवत पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या पाटस पोलीस चौकीचे पोलीस हवालदार संदीप उर्फ संभाजी जगन्नाथ कदम रा. बारामती, मूळ रा. लासूर्णे, ता. इंदापूर यांचा बारामती शहरात बारामती भिगवण रस्त्यावरील हॉटेल अभिषेक समोर शुक्रवारी दिनांक २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी साधारण साडेपाच वाजता ते रोजच्या प्रमाणे व्यायामासाठी जात असताना पाठीमागून आलेल्या तीन चाकी टेंपोने जोरदार धडक दिल्याने अपघात झाला होता. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. डोक्याला मार लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होती. उपचारासाठी त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. व तेथून पुन्हा बारामतीला हलविण्यात आले होते. येथे उपचारा दरम्यान सोमवारी त्यांचा मृत्यू झाला. 

            कदम हे यवत पोलिस ठाण्याच्या अंतर्गत पाटस पोलिस चौकीत ते कार्यरत होते. हवालदार कदम यांची मृत्युची बातमी कळताच परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

أحدث أقدم