सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे : 'असेल कल्पवृक्ष हा योगाचा प्रत्येकाच्या दारी','तर होईल योगोपचार प्रत्येक रुग्णाच्या घरी' योगोपचार म्हणजे योगाचे उपचार होय.
म्हणजेच उपचाराकरता केलेल्या यौगिक प्रक्रिया होय. जेव्हा शरीरात काहीतरी बिघडते त्यावेळी उपचार करून तो बिघाड दूर करावा लागतो. शरीराच्या कार्यात बिघाड उत्पन्न झाला तर तो दूर करण्याकरता काहीतरी करावे लागते त्यांनाच उपचार म्हणतात. हा बिघाड दूर करण्याचे कार्य यौगिक पक्रिया करतात. त्या यौगिक प्रक्रियांची एक विशिष्ठ झाली हीच योगोपचार पद्धत होय. रुग्णाला रोगापासून मुक्त करने वा वेदना कमी करणे किंवा रोगाच्या लक्षणांवर उपाययोजना करणे यासाठी करण्यात येणाऱ्या सर्व उपचारात्मक प्रक्रिया म्हणजे योगोपचार किंवा चिकित्सा होय.
--आयुर्वेद, होमिओपॅथी, अॅलोपॅथी, निसर्गोपचार व चुंबकोपचार अशा वैद्यकिय शास्त्रांचा मुख्य उद्देश रोगोपचार असतो.--
काही आजारासाठी हजारो वर्षापासून चिकित्सेमध्ये योगाचा उपयोग होत आलेला आहे. मात्र योग चिकित्सा किंवा योगोपचार हे योग शास्त्राचे मुख्य उद्दिष्ट नाही असे मानले जाते.
शरीर, प्राण व मन यांच्या कार्यात निर्माण झालेल्या बिघाड म्हणजे विकार. हा बिघाड दूर करून त्याचे कार्य पूर्वीस्थितीला आणणे म्हणजे विकार मुक्ती अशा प्रकारच्या विकार मुक्ततेकरिता योगोपचार पद्धती उपयोगी पडते. योगोपचाराचा विचार हा विकारमुक्तते करताच केलेला आहे. विकारग्रस्त असलेल्या रुग्णाला विकारमुक्त करणे हाच या योगोपचार पद्धतीचा उद्देश आहे.
आपल्याला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवणाऱ्या अश्या, महान पतंजली ऋषींना या श्लोकाद्वारे किंवा या सुत्राद्वारे आपण सर्वजन वंदन करु या.....
योगेन चित्तस्य पदेन वाचां, मलं शरीरस्य च वैद्यकेन। योऽपाकरोत् तं प्रवरं मुनीनां, पतंजलि प्रांजलिरानतोऽस्मि।।
या श्लोकातून महर्षी पतंजली ऋषींची महानता सांगितली आहे. महर्षी पतंजली इ.स.पू. दुममा शतकातीने पूर्णपणे या आपल्या ग्रंथात योगाचे शास्त्र मुद्देसुद योगसूत्र विशद केले आहे. त्यात यम, नियम, आसन, प्राणायाम् प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी या आठ अंगाचा उल्लेख केला गेला आहे.
यापैकी पहिली चार अंगे शरीराशी निगडीत असून त्यांच्या सरीराच्या आरोग्याशी संबंध आहे. इतर चार अंगे मनाच्या आरोग्याशी निगडीत आहेत. शरीराची विशिष्ट तयारी करणे तसेच मन आणि चित्रशक्ती यांची ताकत वाढवणे यासाठी पहिल्या चार, अंशाचा अभ्यास उपयोगी पडतो. निरोगी शरीरात मनही निरोगी असते. असे योगशास्त्रात मानले जाते. योगशास्त्र मुळात वैकशास्त्र नाही हे लक्षात घेऊन त्याचा रोगोपचारात उपयोग केला पाहिजे. योगशास्त्रान आरोग्यरक्षण, रोगनिवारण, व्यक्तिमत्व विकास यासारखे विषय येतात म्हणून योगशास्त्र व चिकित्सा शास्त्रात जवळचा संबंध आहे. धौनी, बस्ती, नेती, त्राटक, नौली आणि कपालभाती या सहा यौगिक शुद्धिक्रिया आहेत. योग ही उपचार पद्धती नसताना सुद्धा योगाचा वापर उपचार पद्धती म्हणून करता येतो. यौगिक प्रक्रियांचा उपचाराकरता वापर तडजोड आहे असे म्हणतात पण माझा स्वतःचा अनुभव तडजोड नसून ती एक उपचार पद्धतीच आहे. असे म्हणता येईल परंतू योगोपचारात स्वयंभू अशी निदान चिकित्सा पद्धती नाही. निदानाशिवाय उपचार करता येत नाही म्हणून निदानाकरता अन्य उपचार पद्धतीतील निदान चिकित्साच वापरावी लागते. ---उदा- रक्तशर्करेचे मापन किंवा स्पाँडिलायटीचे निदान करण्या- करता क्ष किरण फोटो, MRI (Magnetic Resonance Imaging) करूनच योगोपचार करता येतो.
योगोपचार रुग्णाला स्वतः करावे लागतात व रोजचा काही वेळ त्याकरता दयावा लागतो. औषधांप्रमाणे पाच दहा सेकंदात योगोपचार होत नाहीत म्हणून जे विकार थोड्याशा औषधाने बरे होतात त्याकरता कोणी योगोपचाराकडे येत नाही; पण ज्यावेळी औषधांचे दुष्परिणाम त्रासदायक होतात व औषधांचा उपयोग होत नाही अश्यावेळी योगोपचारा शिवाय पर्याय नसतो. अश्या प्रकारे अनेक विकार कोणत्याही उपचार पद्धतींना दाद देत नाहीत पण योगोपचाराने ते बरे होतान हा चमत्कार, योगाच्या माध्यमातून होतो, याचे महत्वाचे कारण योगाने विकाराचा विचार फार खोलवर केला आहे. मानवी जीवनाच्या सर्व पैलूंचा एकत्रित विचार योगाने केला आहे.
---योग आरोग्यासाठी फायदेशीर आहे. योग जीवनासाठी गुणकारी आहे.--
योग असे जेथे। आरोग्य वसे तेथे।।
या श्लोगननुसार मी (शोभा होन्नाकोरे) माझा स्वतःचा अनुभव मांडण्याचा प्रयत्न करते. २००८ साली स्कूटर अपघाताने मणक्याचा त्रास सुरु झाला. मग काय एक्सरे, MRI कुरुन औषधोपचार सुरु झाले डॉक्टर म्हणाले मणक्यात गॅप (स्पाँडिलायटी) आहेत. मणक्यात दोन हाडाच्या चकतीमध्ये रॉड घालावे लागेल. रॉड टाकल्यावर हालचालीवर निर्बंध येतात् एवढे माहिती होते. रॉड न घालताच मी योगाकडे वळण्याचा निर्णय घेतला. २००९ सालापासून योग क्षेत्रात येण्यासाठी माझ्या आयुष्यातील हा निर्णायक टप्पा ( टर्निंग पॉईंट) ठरला. योग करीत गेले. यामध्ये यम नियमांचे पालन करीत आसने, प्राणायाम, सूर्यनमस्कार झेपेल पेलवेल तेवढेच करीत गेले. याबरोबरच आहारावरही लक्ष केंद्रित केले. जड अन्न, तिखट, मसालेदार पदार्थ व वातूळ पदार्थ इत्यादीवर निर्बंध आणले योगोपचार स्वतःच स्वतः सुरु केला. फक्त मानेने पुढे झुंकायचे नाही येवढे तंत्र लक्षाव देऊन आसने करीत राहिले. याबरोबरच पंचकममध्ये स्नेहन, स्वेदन, वमन विरेचन असेही उपचार सुरु ठेवले माझ्या शरीरातील वेदना जसजश्या कमी होत गेल्या तसतश्या योगा प्राणायामाची आवड वाढत गेली. परंतू या उपचारात् नियमितपणा व सातत्य यामुळे मी स्वतःच्या वेदनेवर विजय मिळवला. मग मी पतंजलीचा योगा हा तीन महिन्याचा केवल केला. टिळक विद्यापिठाचा आयुर्वेद व योग पदविका तसेच योग शिक्षक पदविका पूर्ण केला. आता योगशास्त्रामध्ये एम्.ए. करीत आहे. योगोपचाराने वेदना त्रास कमी झाले या स्वानुभवाने योग वर्ग घेऊ लागले. तसेच इतरही बऱ्याच लोकांचेही गेल्या पंधरा वर्षापासून योगोपचार करू लागले मी कर्णबधिर मुलांची शिक्षिका आहे. जे विद्यार्थी खूप चंचल असतान: एक ठिकाणी शांत बसत नाहीत किंवा त्यांचे मन एकाग्र होत नाही त्यासाठी गेले कित्येक वर्षापासून ओंकार साधना व विष्यशनेतील आनापान घेते याही योगोपचाराचा विद्यार्थ्यांना खूप फायदा झाला. याचा मला आनंद आहे. तसेच चांगल्या कमाचा मार्ग मिळाला हे आत्मिक समाधान खूप आहे. असे म्हणावेसे वाटते की, सब रोगों का एक ही समाधान। योगा करो सुबह और शाम ।। योगोपचार म्हणजे काय हे समजून घेतल्यावर निर्माण करणारे घटक कोणते आहेत याची निश्चिती करणे
ही योगाची
--पहिली पायरी होय. हे घटक बाह्य किंवा अंतर्गतही असू शकतात. उदा-मधुमेह या विकारामध्ये अनावश्यक व अती ताणामुळे निर्माण होते. अश्या वेळी हे तान का व कसे निर्माण होतात यासंबंधी योगोपचार मध्ये विचार करावा लागतो.
--दुसरी पायरी म्हणजे साधी निर्माण करणाऱ्या कारणांची निश्चिती केल्यानंतर ते समूळ नष्ट करण्याकरता उपाययोजना करणे वरील उदाहरणावरुनच मधुमेह झाल्यावरच मनातील ताण कमी करण्याकरता दोन पद्धतीने करता येईल. पहिली म्हणजे मनावरील ताण वाढवणाऱ्या गोष्टीपासून दूर राहणे. तसेच मनावरील ताण कमी करणारे खेळ. खेळणे. --तिसरी पायरी म्हणजे शरीराला पूर्वस्थितीला येण्याकरता मदत करणे. योगोपचार करताना शरीरांतर्गत संरक्षण शक्तीची वाढ व जोपासना करणे हाच योगोपचाराचा खरा मार्ग आहे.
अनेक विकारांचे कारण 'जंतू' जंतूंचा प्रादुर्भाव झाला की विकार होतेसतात. शरीरान आजकालचे वाढते औद्योगीकरण, प्रदुषण, बदलती गतिमान जीवनपद्धती जिवाणूंचा वाढता प्रभाव व त्याचबरोबर मानवाची, वापर न केल्यामुळे निसर्ग नियमानुसार क्षीण होत चाललेली आंतरिक प्रतिकार शक्ती केवळ औषधाच्या साहाय्याने माणसाला विजय मिळणे कठीण आहे. विकार नाहीसे करण्याकरता योगाने जो भर दिला आहे तो मानवी शरीराची व मनाची प्रतिकारशक्ती जी जन्मतःच असते ती वाढविण्याकडे, बाह्य आधात कोणताही व कसाही आला तरी शरीर-मनाचे संतूलन बिघडणार नाही अशी स्थिती निर्माण करण्याचा परिणाम योगाच्या निरनिराळ्या प्रक्रियांच्या साहाय्याने घडतो. बाह्य कारणापेक्षा शरीर मनाच्या आंतरिक स्थितीकडेच योगान अधिक लक्ष दिले आहे. हा सर्व विचार लक्षात घेऊन योगोपचार पद्धतीची आखणी करता येते याकरता योगाच्या उपलब्ध असलेल्या प्रक्रियांच्या साहाय्याने हे परिणाम साधता येतात.
याचे वर्गीकरण चार भागात करता येईल
१) अन्नमय कोष- यामध्ये शरीरांतर्गत शुद्धीचा विचार केला आहे. शरीराच्या चलनवलनाकरता शरीरात अनेक प्रक्रिया चालू असतात. या प्रक्रियांमधून शक्ती निर्माण होते व तिच्या सहाय्याने शरीराचे कार्य चालने शरीरावयांची स्थिती सुधारणे निरनिराळ्या कारणांमुळे शरीरांतर्गत अवयवांचे कार्य ४ विधडते योगासनामुळे त्या अवयवांवर वा त्या अवयवांचे कार्य नियंत्रित करणाऱ्या अंत: स्रावी ग्रंथीवर ताण, दाव आल्याने त्यांचे कार्य सुधारने
२) प्राणमय कोष -शरीरावयांचे कार्य सुधारणे- शरीरावयाच कार्य सुधारण्याकरिता त्या अवयवांना पुरेशा प्रमाणात प्राणशक्तीची आवश्यकता असते. हे प्राणशक्तीचे संतुलन बिघडले तरी अनेक विकार होऊ शकतात. हे सतुलन सुधारण्याकरता प्राणायामाची प्रक्रिया उपयुक्त ठरते शरीरावयाचे संतुलन-कोणतेही कार्य करण्याकरता सर्व अवयवांच्या कार्यात सुसूत्रता हवी शरीराचे संतूलन बिघडले तर अनेक विकार होऊ शकतात हे संतूलन सुधारण्या करता मन अंतर्मुख करायला लावणारी प्रत्याहाराची प्रक्रिया विकार मुक्तीकरिता आवश्यक आहे.
३) मनोमय कोष- मनावर होणाआ आघातामुळे मनाची स्थिरता, बिघडते. व त्याचा परिणाम शरीरावयवांच्या भारोग्या वर होतो. मनाची स्थिरता धारणेच्या अभ्यासातून साध्य होऊ शकते. स्थिर झालेला मनावर ध्यानाच्या अभ्यासाने शरीरावयांचे बिघडलेले कार्य सुधारता येते.
४) भावात्मक कोष। आनंदमय कोष- बाह्य परिस्थितीच्या आघातातून विकार निर्माण होतात ब्राह्य परिस्थिती आपल्या नियंत्रणाखाला नसते परंतू आपली प्रतिक्रिया नियंत्रित केली तर त्या आघाताचा त्रास होणार नाही हा त्रास कमी किंवा परिणाम कमी करण्यासाठी यमनियम पालनाच्या अभ्यासातून ही हा कोण विकसित होईल.
या सर्व अभ्यासातून सुव्यवस्थितपणे घालवल्यास विकार मुक्तीची स्थिती येते.
आता आपण विकारग्रस्तते कडून विकार मुक्तीचे टप्पे कोणते असू शकतात याचा विचार करू.
--योगोपचार सुरु केल्यानंतर रुग्णाचा त्रास न वाढणे.--
→ योगाभ्यास निरंतर केल्याने विकाराची तीव्रता कमी कमी होत जाऊन विकार नाहीसा होतो
→ योगोपचाराने शरीराची नैसर्गिक प्रतिकार शक्ती वाढू लागते. रुग्णाची औषधे कमी होतात औषधे घेताही विकाराची लक्षणे दिसत नाहीत. विकाराची लेणे नसली तरी काही पये चालू देवावी लागतात, योगाभ्यास निरंतर चालूच देवावा यामुळे विकाराचे बीजच नाहीसे होईल योगोपचारा पद्धतीचे आणखी एक वैशिष्ट्य आहे की योगोपचाराच प्रवास अतिशय सुखावह व आनंददायी असतो. योग हे जीवनदर्शन आहे उपचार पद्धती नाही हे जरी सत्य असले तरी योगातील अनेक प्रक्रिया उपचारात्मक परिणामुळे विकार मुक्ती करता वापरल्या जातात हे माझ्या स्वतःच्या अनुभवाने सिद्ध झालेले आहे.
उदा- ★हृदयविकारासाठी - योगनिद्रा प्रणवसाधना यौगिक प्रक्रिया - ध्यान, प्राणायाम योगासने व शुद्धिक्रिया. ★ अतिरक्तदाब - शवासन, ★मधुमेह- यौगिक शुद्धिक्रिया आसने , प्राणायाम व आहार नियंत्रण ★निद्रानाश- आसने, व्यायाम ★ मणक्याचा त्रास- आसने, प्राणायाम ★लठ्ठपणा- सोपी आसने, प्राणायाम, यौगिक शुद्धिक्रिया आणि आहार नियंत्रण इत्यांदी बर बऱ्याच रोगावर वेगवेगळ्या प्रकारे योगोपचार करता येतात.
सर्वात महत्वाचे म्हणजे सोगोपचार तज्ञव्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली करणे हिताचे असते. 'सकाळी किंवा संध्याकाळी रोज करा योग’‘ तुमच्या जवळ येणार नाहीत रोग’


إرسال تعليق