शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

नीरा येथील ज्युबिलिइंट इंग्रिव्हीया कंपनीत स्फोट


 सुशीलकुमार अडागळे

महाराष्ट्र पोलीस न्युज 


पुणे (बारामती) : नीरा येथील ज्युबिलिइंट इंग्रिव्हीया सायन्स कंपनीमध्ये मेंटेनन्सचे काम सुरू असताना येथील ऍसिड कॉम्प्रेसरच्या दुरुस्तीचे काम करत असताना स्फोट होऊन यामध्ये तीन जण जखमी झाल्याची माहिती स्थानिक लोकांनी दिली आहे.

              मेंटेनन्सचे काम सुरू असताना दोन जण किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी लोणंद येथील खाजगी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती कंपनीचे जनसंपर्क अधिकारी इसाक मुजावर यांच्या वतीने देण्यात आली आहे.

            पुरंदर आणि बारामतीच्या सीमेवर असलेल्या कंपनीमध्ये अनेक वेळा अपघात होत असतात. मागील तीन वर्षांपूर्वी झालेल्या अपघात लोकांच्या अजूनही लक्षात असून आज शनिवारी पुन्हा एकदा या कंपनीमध्ये सकाळी ११ वाजलेच्या सुमारास एक स्फोट झाला इथेनॉल असिट प्लांटच्या मेंटनंसचे काम सुरू असताना हा स्फोट झाला या स्फोटामध्ये तीन जण जखमी झाले आहेत. यामध्ये तिघा जणांना मोठ्या प्रमाणात दुखापत झाली असून त्यांना लोणंद येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर यातील एकाला पुन्हा लोणंद येथून उपचारासाठी पुण्यामध्ये पाठवण्यात आले आहे तर याध्ये एकूण चार जण जखमी असल्याची माहिती स्थानिक लोकांनी दिली आहे.

          या संदर्भात कंपनी प्रशासनाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र याबाबत त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. कंपनीचे जनसंपर्क अधिकारी इसाक मुजावर यांनी यामध्ये दोन जण जखमी झाल्याच्या वृत्ताला दुसरा दिला आहे.

Post a Comment

أحدث أقدم