सुनिल थोरात (संपादक)
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (हडपसर) : रयत शिक्षण संस्थेच्या गर्ल्स इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये माता पालक संघाच्या सभेतून माता पालकांना आहार व आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले.
डॉ. साधना धर्माधिकारी यांनी उपस्थित महिला पालकांना आपल्या पाल्याचे आरोग्य व आहार कसा असावा याचे बहुमूल्य मार्गदर्शन केले.
तसेच घरातील सर्वांची काळजी घेणाऱ्या महिलेने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते. त्यासाठी महिलांना आपल्या आरोग्य आणि आहाराकडे पूर्ण लक्ष देणे कसे गरजेचे असते या विषयी महत्त्वाच्या टिप्स दिल्या. तसेच महिलांना डॉ. धर्माधिकारी यांनी महिलांना ब्रेस्टचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, ॲनिमिया, रजोनिवृत्ती या विषयी मार्गदर्शन केले.
यावेळी माता पालकांच्या प्रश्नांचे व शंकांचे समाधान केले.
रयत शिक्षण संस्थेच्या गर्ल्स इंग्लिश मिडियम स्कूल विद्यालयाच्या प्राचार्या ज़ीनत सय्यद यांनी माता पालकांना संबोधित केले. विभागप्रमुख नीलिमा जगताप, वृषाली घुमटकर आणि ज्योती भंडार यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. माता पालक संघाच्या प्रमुख सारिका गवळी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही योगदान दिले.

إرسال تعليق