शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

१४ मोटार सायकल चोरीचे व ०२ घरफोडी चोरीचे असे एकूण १६ गुन्हे उघडकीस ; स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण ची कारवाई


 सुनिल थोरात (संपादक)

महाराष्ट्र पोलीस न्युज 


👉🏻दोन चोरटयांकडून सुमारे ११ लाख ५० हजार रू. चालू बाजारभाव किंमतीच्या १३ मोटार सायकल हस्तगत करून १४ मोटार सायकल चोरीचे व २ घरफोडी चोरीचे असे एकूण १६ गुन्हे उघडकीस आणले स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण ची कारवाई 

              पुणे (खेड - जुन्नर) उपविभागात मोटार सायकल चोरीचे गुन्हयांमध्ये वाढ झाली होती. त्या अनुषंगाने पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी सदर मोटार सायकल गुन्ह्यांचा तपास करून लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या असता पथकाने मोटार सायकल चोरीचे गुन्हयांमध्ये जामीनावर सुटलेले आरोपींना तपासण्यास सुरूवात केली असता गोपनीय बातमीदारांकडून बातमी मिळाली की, संदीप दुधवडे, तुषार केदार, भाऊसाहेब दुधवडे हे काही कामधंदा करत नसून त्यांच्याकडे वेगवेगळ्या मोटरसायकल असतात. मिळालेल्या बातमीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित इसमांची माहिती घेतली असता ते नारायणगाव येथील नंबरवाडी या ठिकाणी येणार असल्याने सापळा लावून संदीप बारकू दुधवडे वय १८ रा. म्हसोबा झाप ता. पारनेर, तुषार पांडुरंग केदार व वय २२ रा. पोखरी पवळदरा . पारनेर जि.अ. नगर यांना ताब्यात घेतले, चौकशीत त्यांनी खेड, नारायणगाव, आळेफाटा, जुन्नर परिसरातुन तसेच नगर भागातून काही मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली. असून गुन्हे करताना त्यांचे सोबत त्यांचा तिसरा साथीदार नामे भाऊसाहेब गंगाराम दुधवडे हा असल्याचे सांगितले.

              तसेच त्यांनी दोन घरफोड्या चोरी केल्या असल्याचे त्यांनी सांगितले. सदर आरोपी हे रात्रीचे वेळी एकत्र येवून मजूरी कामासाठी जातो असे घरी सांगून विशेषतः स्प्लेंडर मोटार सायकलची चोरी करत असे. 

             एकूण १३ मोटार सायकल ११ लाख ५० हजार रू. चालू बाजारभाव किंमतीच्या हस्तगत करण्यात आल्या.

              स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण कडून सन २०२३ मध्ये चोरी गेलेल्या एकूण ७० मोटार सायकल हस्तगत केलेल्या असून ४६ मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. ही कामगिरी मा. पोलीस अधीक्षक अंकित गोयल, पुणे ग्रामीण, मा, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे पुणे विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र चौधर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, नारायणगाव पो स्टे चे सपोनि महादेव शेलार, स्था.गु.शा. कडील पो.स.ई. अभिजीत सावंत, पोलीस अंमलदार दिपक साबळे, विक्रम तापकीर, राजू मोमीण, अतुल डेरे, संदिप वारे, अक्षय नवले, निलेश सुपेकर यांनी केली. आरोपी सध्या पोलीस कोठडी रिमांड मध्ये असून पुढील तपास नारायणगाव पोलीस स्टेशन करत आहे.

Post a Comment

أحدث أقدم