शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

राष्ट्रीय ग्राहक दिनाचा कार्यक्रमाचा अवमान करुन शिरुरचे नायब तहसिलदार प्रकाश मुसळे यांनी पदाचा गैरवापर, कर्तव्यात कसुर, ग्राहक दिनाचा अवमान करुन अरेरावीच्या भाषेत धमकी दिले : मारुती पठारे


 सुनिल थोरात (संपादक)

महाराष्ट्र पोलीस न्युज 

पुणे (शिरूर) : राष्ट्रीय ग्राहक दिनाचा कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी गेलो असता अवमान करुन शिरुरचे नायब तहसिलदार प्रकाश मुसळे यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करुन व कर्तव्यात कसुर करुन समाजसेवक अरेरावीच्या भाषेत धमकी दिल्याची तक्रार शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांना ग्राहक कल्याण फाऊंडेशनचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मारुती पठारे यांनी निवेदनाद्वारे तक्रार केली आहे .

             मारुती पठारे हे ग्राहक कल्याण फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य या ग्राहक संघटनेकडे पुणे जिल्हा उपाध्यक्ष म्हणुन निःशुल्क समाजसेवेचे काम करत आहेत. 

            परंतु २१/१२/२०२३ रोजी तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या निमंत्रणावरुन शिरुर येथे दुपारी ३.०० वाजता अन्य सर्व ग्राहक संघटनां सहित चर्चा सत्र सुरु केले होते. त्यामध्ये तहसिलदार यांना २४ डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करत असतो व तो साजरा करावा असा शासनाचा आदेश आहे. त्यासाठी चालू पंधरवाडा हा ग्राहकांची जनजागृती म्हणुन गावोगावी व शाळा, विदयालय व ग्रामपंचायत अशा सार्वजनिक ठिकाणी ग्राहक प्रबोधनाचे कार्यक्रम घेण्यात यावे असे सांगितले.  

             त्या अनुषंगाने शासकिय अधिकारी यांना ग्राहक दिनानिमित्त नागरिक व ग्राहक प्रबोधन करण्यासाठी मारुती पठारे दिनांक २८/१२/२०२३ रोजी शिरुर तहसिल कार्यालयात दुपारी १२.३० ते १.१५ वाजता नायब तहसिलदार प्रकाश मुसळे यांच्या कॅबिनमध्ये गेले असता त्यांना ग्राहक दिनानिमित्ताने ग्राहक दिनाची माहिती देत असताना पठारे यांचे काही एक ऐकुन न घेता अर्वाच्य भाषेत पठारे यांना म्हणाले, तु निमंत्रण देणारा कोण, मला निमंत्रण देत आहे. त्यासाठी तुझ्याकडे शासनाचे परिपत्रक आहे का? मी नाही म्हणलो. त्यावर नायब तहसीलदार म्हणाले "चल बाहेर निघ" असे बोलुन मला मोठ्या आवाजात धमकी दिली. असे मारुती पठारे यांनी महाराष्ट्र पोलीस न्युजशी बोलताना सांगितले.

          परंतु अन्न व नागरी पुरवठ्याचे कामकाज नायब तहसिलदार यांचीच जबाबदारीत आहे व त्यांना राष्ट्रीय ग्राहक दिनाचे महत्त्व हे आमच्या सारख्या सामान्य ग्राहकाला समजण्यासाठी ग्राहक दिनाचे जनजागृती करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करावे लागतात.

           तरीही नायब तहसिलदार प्रकाश मुसळे यांनी जाणुनबुजुन राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यास गेलो असता ग्राहक म्हणून पठारे व ग्राहक दिनाचा अवमान केलेला आहे व राष्ट्रीय ग्राहकदिनी सप्ताह कार्यक्रम करण्यास शासकिय अधिकारी यांनी अडथळा केला आहे. शासनाचे धोरण व तहसिलदार यांच्या सुचनेचा अवमान शिरुरचे नायब तहसिलदार प्रकाश मुसळे यांनी केला आहे. असे माझे ठाम मत आहे. अशा शासकिय कार्यक्रमात अडथळे करुन समाजाच्या भावना दुखवणारे अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशा आशयाचे  लेखी तक्रार मारुती पठारे यांनी तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांना केली आहे. 


                                ग्राहक कल्याण फाऊंडेशन पुणे जिल्हा उपाध्यक्ष : मारुती पठारे

          तहसीलदार यांच्या सुचनेचा अवमान, ग्राहक कार्यकर्ता म्हणून अवमान,पदाचा गैरवापर, कर्तव्यात कसूर व अरेरावीची भाषा या संदर्भात कलेक्टर, जिल्हा अधिकारी, विभागीय आयुक्तांकडे पत्र व्यवहार करून ग्राहक म्हणून न्याय मागणार आहे.

            

                               ‌                    नायब तहसीलदार : प्रकाश मुसळे

                 याबाबत मला लेखी तक्रार आल्यावर मी उत्तर देईन या बाबत मी आत्ता बोलू शकत नाही. परत बोलतो. 


            ‌                                         तहसीलदार : बाळासाहेब म्हस्के

अशी कुठलीही तक्रार/ निवेदन मला प्राप्त झाले नाही मला याची कुठलीही  माहिती नाही.

Post a Comment

أحدث أقدم