शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

मंतरवाडीतील भाडळे कुटुंबाच्या गाड्यांवर अज्ञात गुंडाचा तीनवेळा हल्ला : लोणी पोलिसांकडून कारवाईची अपेक्षा "


 सुनिल थोरात (संपादक)

महाराष्ट्र पोलीस न्युज


पुणे (हवेली) : उरुळी देवाची मंतरवाडी येथे अज्ञात हल्लेखोरांकडून तीन वेळा हल्ला करून गाड्यांचे नुकसान केले, या हल्ल्यामुळे भाडळे कुटुंब भयभीत झालेले असताना सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झालेल्या हल्लेखोरांना पकडण्यात अद्याप लोणी काळभोर पोलिसांना यश आलेले नाही,

            एनसी दाखल केल्यानंतरही पोलिसांकडून तपासाला विलंब न्यायाच्या प्रतीक्षेत भाडळे कुटुंब आहे.

             यासंदर्भात पुणे पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन कुटुंबियांनी दाद मागितली आहे. या गुन्हेगारांकडून कोयते घेऊन दशहत पसरवली जात असताना पोलीस प्रशासनाने तातडीने आरोपींवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. या संदर्भात शशिकांत भाडळे रा. मंतरवाडी यांनी उरुळी देवाची पोलीस चौकीत तक्रार दाखल केली आहे.

              सविस्तर वृत्त असे की, दिनांक २२ ऑकटोबर २०२३ रोजी काही अज्ञात गुंडानी घरावर हल्ला केला, या हल्ल्यात गाड्यांवर दगडफेक केली, यामध्ये फॉर्च्युनर गाडीचे प्रचंड नुकसान झाले, २३ ऑकटोबर रोजी लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीच्या उरुळी देवाची येथील चौकीत तक्रार दिली. त्यानंतर पुन्हा २४ ऑकटोबर २०२३ रोजी मध्यरात्री पुन्हा हल्ला झाला. फॉर्च्युनर गाडीचे समोरून दगडफेक करून नुकसान केले, सुमारे एक लाखाचे नुकसान झाले. भाडळे कुटुंबीयांनी घरी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले, यानंतर पुन्हा ४ डिसेंबर २०२३ रोजी हल्लेखोरांनी त्यांच्या गाड्यांवर मध्यरात्री ३ वाजून १५ मिनिटांनी हल्ला केला. या हल्ल्यात गाडीवर दगडफेक केली तेव्हा सीसीटीव्ही मध्ये सर्व कैद झाले आहेत. १० ते १२ हल्लेखोरांचा यामध्ये समावेश असून काही गुन्हेगारांच्या हातात हत्यारे दिसत आहेत.

           या घटनेची पुन्हा तक्रार उरुळी देवाची चौकीत केली व सीसीटीव्ही फुटेज दिले. परंतु या संदर्भात चौकीत चौकशी केली असता तपास सुरु आहे असे सांगण्यात आले. तीन वेळा हल्ला होऊनही पोलिसांनी केवळ एनसी दाखल केली. सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत असलेले सर्व आरोपी पाहता हे प्रकरण गंभीर आहे. असे भाडळे कुटुंब यांनी सांगितले. 

              दखलपात्र गुन्हा दाखल केलेला नसल्याने भाडळे  कुटुंब प्रचंड घाबरले. आजूबाजूच्या परिसरात देखील या हल्ल्यामुळे दहशत निर्माण झाली आहे. तीन वेळा हल्ले होऊन सीसीटीव्ही फुटेज देऊनही पोलिसांनी कार्यवाही केली नसल्याने मोठी घटना घडल्यास याला जबाबदार कोण ? असा सवाल निर्माण झाला आहे.

               लोणी काळभोर पोलिसांनी तातडीने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन  गुन्हेगारांना तातडीने अटक करून कडक कारवाई करावी तसेच या भागात गुंडाचा होणारा हैदोस पाहता रात्रीचे पेट्रोलिंग वाढवावी.

             अशी मागणी निवेदनाद्वारे शशिकांत भाडळे व कुटुंबियांनी पुणे पोलीस आयुक्त आणि झोन पाचचे उपायुक्त व वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या कडे केली आहे.



           यासंदर्भात वरिष्ठ लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता सीसीटीव्ही फुटेज मधून आरोपीचे चेहरे व गाड्यांचे नंबर प्लेट लक्षात येत नाहीत. या प्रकरणाचा तपास सुरू असून यावर गुन्हे शाखा टीम काम करत आहे. लवकरात लवकर आरोपी पकडले जातील अशी माहिती चव्हाण यांनी दिली.

Post a Comment

أحدث أقدم