शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

"स्मशान भूमीतील" बीडाचा चौथारा चोरीला गेला...अंतविधी करणे कठीण प्रशासन लक्ष देणार का? : शैलेंद्र बेल्हेकर


 सुनिल थोरात (संपादक)

महाराष्ट्र पोलीस न्युज 


पुणे (हवेली) : मांजरी बुद्रुक गावातील स्मशानभूमी मधील अंत्यसंस्कार करण्यासाठी बसविलेला बीडाचा चौथरा चोरीला गेला आहे.

             पुणे मनपा हद्दीतील मांजरी बुद्रुक हे गाव असून स्मशानभूमीत पुर्ण वेळ रखवालदार नेमलेला आहे? ही जबाबदारी महापालिकेची नाही का? असा सवाल संतप्त मांजरी बुद्रुक येथील रहिवासी नागरिक करीत आहेत. 

           मांजरी बुद्रुक गावाचे नागरीकरण मोठ्या प्रमाणात आणि  झपाट्याने झाल्याने लोकसंख्या ही वाढली. स्थानिकां बरोबर रोजीरोटी साठी आलेले पण स्थायिक झालेले कुटुंबेही आहेत. याच मांजरी बुद्रुक गावात अंतविधीसाठी बिडाचे चार चौथरे बसविण्यात आले होते. त्यातील दोन चौथाऱ्याचा भाग चोरट्यांनी चोरून नेला.

            त्यामुळे लाकडे गोवऱ्या सरपण रचणे अवघड झाले आहे. शिवाय दशक्रिया विधी च्या ठिकाणी मोकाट कुत्री, कचरा, घानीचे साम्राज्य आहे. त्याठिकाणी स्वच्छ्ता नसते. अनेक वेळा सावडणे विधी करण्यासाठी पाणीचीही व्यवस्था नसते. अशी भयानक परिस्थिती असताना पुणे मनपा प्रशासन व अधिकारी या प्रश्नाकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत आहे. असे नागरिक चर्चा करत आहेत. 

            मांजरी स्मशानभूमी मधील सर्व समस्या तात्काळ सुटल्या नाही तर आम्ही स्मशानभूमीत पुणे मनपा प्रशासना विरोधात तीव्र आंदोलन करु असा इशारा मांजरी बुद्रुक गाव तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष शैलेंद्र बेल्हेकर यांनी दिला आहे.

Post a Comment

أحدث أقدم