सुनिल थोरात (संपादक)
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे हवेली (लोणी काळभोर) : लोणी काळभोर मंडल कार्यालयासाठी श्री संत रोहिदास नगर मध्ये चर्मकार समाज मंदिर येथे सर्कल आॅफिस चालु करण्यात आले. या कार्यालयासाठी श्री संत रोहिदास समाजातील बांधवांनी माजी कॅबिनेट मंत्री सुर्यकांत गवळी, विकास तिखे, गोरख ननवरे, गणेश तिखे व इतर समाज बांधवांशी माजी उपसभापती सनी काळभोर, लोणी काळभोर सरपंच योगेश काळभोर, व ग्रामविकास अधिकारी गवारे, ग्रा. सदस्य नागेश काळभोर यांच्याशी चर्चा करुन समाज मंदिरातील एक रुम तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आली. त्या अनुषंगाने सर्कल आॅफिसचे उद्घाटन करण्यात आले.
नागरिकांची प्रलंबित कामे व जी चालू कामे सुरु आहेत ती सर्व कामे वेळेत पूर्ण होतील. शेतकरी बांधवांच्या फेरफारवरील तक्रारींचे निवारण विनाविलंब करण्यात येईल, अशी ग्वाही लोणी काळभोरच्या प्रथम मंडल अधिकारी नूरजहाँ सय्यद यांनी केले.
दत्त मंदिराच्या पाठीमागे श्री संत रोहिदास समाज मंदिर येथे मंडल अधिकारी या नवीन कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी (ता. २९) सर्कल अधिकारी नूरजहाँ सय्यद यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नूरजहाँ सय्यद बोलत होत्या. माजी कॅबिनेट मंत्री सुर्यकांत गवळी, माजी उपसभापती सनी काळभोर, हेमलता बडेकर, लोणी काळभोरचे सरपंच योगेश काळभोर, उपसरपंच प्रियांका काळभोर, माजी सरपंच राजाराम काळभोर, माजी उपसरपंच ज्योती काळभोर, ग्रामपंचायत सदस्य भरत काळभोर, नागेश काळभोर, सविता लांडगे, सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर, अमित काळभोर, राजेंद्र काळभोर, विकास. तिखे, गोरख ननवरे, गणेश तिखे, आदी मान्यवर उपस्थित होते.
माजी उपसभापती सनी काळभोर म्हणाले,
“शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी योग्य पद्धतीने निर्णय घेऊन मंडलाधिकारी कार्यालय हे लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत आणले. यामुळे कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, आळंदी म्हातोबाची, तरडे या गावातील शेतकरी, व नागरिकांची कामे सुलभतेने व पारदर्शक पणे होतील
सरपंच योगेश काळभोर म्हणाले,
“लोणी काळभोर, कदमवाकवस्ती ही दोन्ही मोठी गावे आहेत. यासाठी शेतकरी, नागरिकांना थेऊर या ठिकाणी हेलपाटे मारावे लागत होते. लोणी काळभोर या ठिकाणी झालेल्या कार्यालयाचा उपयोग लोणी परिसरातील नागरिक व शेतकरी यांना होणार आहे".
सिद्रराम मळा येथे तलाठी सजा कार्यालय होणार
लोणी काळभोर या नवीन सर्कल सजामध्ये लोणी काळभोर, सिद्राम मळा, कदमवाकवस्ती, आळंदी म्हातोबाची, तरडे या तलाठी सजाचा समावेश असून, लोणी काळभोरमध्ये नव्याने सिद्राम मळा येथे तलाठी सजा कार्यालय होणार आहे. तसेच संबंधित गावे व तलाठी सजा थेऊर सर्कलमधून वगळण्यात आली आहेत.


إرسال تعليق