शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

अयोध्येतून आलेल्या पवित्र कलशाची शेवाळेवाडी येथे शोभायात्रा



 सुनिल थोरात (संपादक)

महाराष्ट्र पोलीस न्युज 


पुणे (हवेली) : शेवाळेवाडी येथे प्रभू श्रीराम लल्ला यांच्या आयोध्या मंदिरातील पवित्र कलशाची मिरवणूक शेवाळेवाडीतील महादेव मंदिर ते हनुमान मंदिरापर्यंत संपन्न झाली. या शोभा यात्रेसाठी रामभक्तांच्या वतीने मोठ्या प्रमाणात पूर्वतयारी करण्यात आलेली होती. 

            या मिरवणुकी दरम्यान प्रभू श्रीरामांची मूर्ती व कलश ठेऊन पालखी सोहळ्याचे नियोजन करण्यात आले होते. या साठी गावातील महिला वर्ग, जेष्ठ नागरिक, तरुण वर्ग व लहान मुले मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी  पालखीच्या पुढे भजनी मंडळाच्या वतीने भजन व अभंग गाण्यात आले तसेच सनई चौघडे, तुतारी, शंखनाद करून, जय श्रीराम च्या घोषणा देण्यात आल्या अत्यंत शांततेत व भक्तिमय वातावरणात या मिरवणुकीची सांगता झाली.

             राम मंदिर न्यास व गावातील स्वयंस्फूर्तीने सहभागी झालेल्या स्वयंसेवकांनी अत्यंत उत्कृष्ट प्रकारे या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

           २२ जानेवारी २०२४ रोजी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र, अयोध्या येथे श्री राम लल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने शेवाळेवाडी गावामध्ये अक्षता वाटून व विविध कार्यक्रमांचे आयोजन करून सर्व शेवाळेवाडीकर या अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार होणार आहेत अशी माहिती शेवाळवाडी गावचे माजी उपसरपंच, रामभक्त अमित पवार यांनी दिली.

Post a Comment

أحدث أقدم