सुनिल थोरात (संपादक)
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (हवेली) : संचालक मंडळाकडून खोतीदारांबाबत निर्णयास विलंब का? मुख्यमंत्र्यांकडे मागणार दाद... खोतीदारांच्या न्याय्य मागण्यांसाठी चार दिवसापासून मांजरी उपबाजारात गेल्या चार दिवसापासून बाळासाहेब भिसे अमरण उपोषण करत असताना संचालक मंडळाकडून अद्याप निर्णय झाला नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी करून हा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला जाणार आहे. संचालक मंडळाने याबाबत निर्णय घेतला असून एका संचालकाने यांस तीव्र विरोध केला आहे घेतलेला निर्णय जाहीर करण्यास एवढा विलंब का असा सवाल शेतकरी खोतीदार करत आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समिती संचालककडून मांजरी उपवाजारात खोतीदार व्यापारी यांना मज्जाव केल्याने शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन या बाजारात केले व बाळासाहेब भिसे यांनी आमरण उपोषण सुरू केले गेल्या चार दिवसापासून अन्न पाण्यावाचून ते आंदोलन करत आहेत, संचालक सुदर्शन चौधरी छोटे शेतकरी मोठे शेतकरी असा भेदभाव करून खोतीदारांना विरोध करत आहेत, दुबार विक्रेते, ड्रायव्हर यांना उपोषण व्यासपीठ समोर घोषणा द्यायला लावल्या जात आहेत.
त्यामुळे या बाजारातील वातावरण चिघळले आहे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार, शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी आंदोलक भिसे यांच्याशी संवाद साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. हडपसर काँग्रेस अध्यक्ष दिलीप शंकर तुपे, सिनेदिग्दर्शक संदीप इनामके, संजय शिंदे, मराठा टायगर फोर्सचे अध्यक्ष संदीप लहाने, शिवसेना शहर प्रवक्ता अभिजित बोराटे, राष्ट्रवादी काँग्रेस हवेली तालुका अध्यक्ष संदीप बापू गोते, उपाध्यक्ष अशोक आबा गायकवाड यांनी बाळासाहेब भिसे यांना भेटून पाठिंबा दिला.
आठवडे बाजारातून माल घेऊन येणारे छोटे कष्टकरी व्यापारी दौंड मंगल साबळे, हडपसर सिंधू कोळीगीर भाग्यश्री थोरात, शांताबाई कोळपे मार्केट मध्ये बंद केल्याने उपासमार होत असल्याची व्यथा मांडली.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव राजाराम धोंडकर यांच्याशी संपर्क साधला असता, खोतीदार व्यापारी यांना मांजरी उपबाजारात एक तारखे पासून प्रवेश दिला जाणार असून त्यानंतर कोरेगाव मूळ येथे होते झाडांसाठी स्वतंत्र मार्केट करणार असल्याचे त्यांनी सांगितले, संचालक मंडळाने निर्णय घेतला असेल तर जाहीर करण्यास विलंब का असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.


إرسال تعليق