शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

वकील पती-पत्नी हत्याप्रकरणी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषध : राहुरी


 नागनाथ ससाणे (प्रतिनिधी)

महाराष्ट्र पोलीस न्युज


अहमदनगर (राहुरी) : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील न्यायालयात वकिली व्यवसाय करणाऱ्या ॲड राजाराम आढाव व त्यांची पत्नी मनीषा आढाव राहणार मानोरी तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर या वकिलांचे खंडणीसाठी अपहरण करून हत्या करण्यात आली आहे या घटनेचा उदगीर वकील संघाच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालय उदगीर येथे जाहीर निषेध करून लेखणी बंद आंदोलन करण्यात आले.




              प्रकरण उच्चस्तरीय तपासणी सी आय डी मार्फत तपास करण्यात यावा. ॲड आढाव यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्यात यावी.

           प्रकरण अति जलद न्यायालयात चालविण्यात यावे. व पिढीता कडून काम पाहणे कामी सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून जेष्ठ विधीज्ञ ॲड उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी. पिडीतांचे कुटुंबियास शासनाकडून जास्तीत जास्त अर्थिक मदत करण्यात यावी. तसेच प्रलंबित वकील संरक्षण कायदा लवकरात लवकर लागू करण्यात यावा.

             या मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी कार्यालय उदगीर येथे देण्यात आले यावेळी वकील संघाचे पदाधिकारी यांनी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.



Post a Comment

أحدث أقدم