शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

तृतीयपंथी व्यक्तींच्या नोंदणीसाठी विशेष शिबिराचे आयोजन


 सुनिल थोरात (संपादक)

महाराष्ट्र पोलीस न्युज 


पुणे : सहायक आयुक्त समाज कल्याण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व युवा विकास व उपक्रम केंद्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने एच. व्ही, देसाई कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय बुधवार पेठ, पुणे येथे तृतीयपंथी व्यक्तींना प्रमाणपत्र व ओळखपत्र नोंदणीबाबत  विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले.

              या शिबीरात एकूण ६४ तृतीयपंथी व्यक्तींची नोंदणी करण्यात आली. यावेळी समाज कल्याण कार्यालय व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यामार्फत तृतीयपंथी व्यक्तींना प्रमाणपत्र व ओळखपत्रासाठी आवश्यक असणारे मुद्रांक पेपर व नोटरीची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.

              सर्व नोंदणीकृत तृतीयपंथी व्यक्तींची तात्काळ टी. जी. पोर्टलवर नोंदणी करण्याची प्रक्रिया सहायक आयुक्त, समाज कल्याण पुणे आणि युवा विकास व उपक्रम या केंद्रामार्फत करण्यात आली. नोंदणी झालेल्या तृतीयपंथी व्यक्तींना समाज कल्याण कार्यालयामार्फत रेशन किटचेही वाटप करण्यात आले. शिबीर यशस्वी करण्यासाठी एच. व्ही. देसाई कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे सहकार्य लाभले.

Post a Comment

أحدث أقدم