सुनिल थोरात (संपादक)
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (हडपसर) : महाविद्यालयीन विद्यार्थी व परिसरातील पर्यटन उद्योग यांचे एकमेकांचे संबंध दृढ व्हावेत, काळाची गरज ओळखून अभ्यासक्रमात समावेश व्हावा या उद्देशाने सोहम अकॅडमी व अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या पर्यटन आणि सेवा उद्योग विभाग यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला.
यावेळी सोहम अकॅडमीचे संचालक सोहम दादरकर व अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपसचिव मा. एल एम पवार यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर सह्या केल्या. सोहम अकॅडमी ही संस्था पर्यटन या क्षेत्रात काम करत असून त्यासाठी लागणारे ज्ञान, माहिती, कौशल्य विद्यार्थ्यांना पुरविण्यासाठी प्रयत्नशील आहे. महाविद्यालयात पर्यटनाची पदवी असून विद्यार्थ्यांना शिक्षण घेऊन बाहेर पडल्यावर व्यवसायाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी महाविद्यालय प्रयत्नशील असते.
यामध्ये झालेल्या करारामुळे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना पर्यटनाच्या क्षेत्रात काम करण्यासाठी ज्ञान व कौशल्य मिळेल, संधी उपलब्ध होतील असे मत डॉ नितीन घोरपडे यांनी मांडले.
यावेळी उपसचिव पवार यांनी पर्यटनाला सध्या मोठी मागणी असून या उद्योगाला आवश्यक मानवी संसाधन पुरवले जात नाही. अशा सामंजस्य करांमुळे करारामुळे मानवी संसाधन पुरवण्यास मदत होईल असे मत व्यक्त केले. सोहम दादरकर यांनी त्यांच्या संस्थेमार्फत दिल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची यावेळी माहिती दिली. या अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या कोर्स मुळे विद्यार्थ्यांना नोकरी व व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील असे मत व्यक्त केले. यावेळी डॉ. सविता कुलकर्णी यांनी आभार मानले.


إرسال تعليق