सुनिल थोरात (संपादक)
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (हवेली) : पुर्व हवेलीतील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत मधील गुजरवस्ती येथे शिक्षणाची जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले १९२ व्या जयंती, अयोध्या श्री राम मंदिर प्रतिष्ठानच्या मंगल अक्षदा वाटप, निवृत्ती शिक्षक सन्मान व व्याख्यान आयोजित करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज व शिक्षणाची जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रवीण नाना काळभोर उपाध्यक्ष भाजपा पुणे जिल्हा सदस्य पुणे जिल्हा नियोजन समिती, शुभहस्ते विकास जगताप उपाध्यक्ष भाजपा व्यापारी आघाडी संचालक पंतप्रधान विश्वकर्मा शासकीय समिती पुणे, मल्हार पांडे व्याख्याते, विशाल गुजर शहराध्यक्ष भाजप कदमवाकवस्ती, नितीन टिळेकर भाजपा चिटणीस ओबीसी मोर्चा पुणे जिल्हा उत्तर, गणेश घाडगे सदस्य रेल्वे एस सी सी समिती यांच्या हस्ते करण्यात आली.
प्रविण नाना काळभोर : उपाध्यक्ष भाजपा पुणे जिल्हा सदस्य पुणे जिल्हा नियोजन समिती,
आजचा दिवस हा क्रांती ज्योती सावित्री बाई फुले यांच्या १९२ व्या जयंती निमित्त सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या कार्याला उजाळा देऊन जगण्याचा आहे. अतिशय कमी वयात लग्न होऊन सुद्धा फार मोठे सामाजिक कार्य आपल्या पतीला साथ देऊन केले. प्लेगच्या साथीच्या रोगाने सर्वत्र धुमाकूळ घातला असताना स्वतः घरातून बाहेर निघून समाजाची सेवा केली. कार्य करता करता त्यांही या रोगाने आजारी पडल्या व आपल्या नश्वर देहाचा त्याग केला.
विकास जगताप : उपाध्यक्ष भाजपा व्यापारी आघाडी संचालक पंतप्रधान विश्वकर्मा शासकीय समिती पुणे,
क्रांतीसूर्य सावत्रीबई फुले यांनी त्या काळात स्वतः शिक्षण घेऊन मुलींना शिक्षण देण्याचे महत्त्वाचे काम केले. त्या काळात स्त्रीयांना शिक्षणास बंदी होती. अनेक अंधश्रद्धा होत्या. तर स्त्रियांना सती जावे लागत असे सावित्रीबाई फुले यांच्या परिवर्तना मुळे आज स्त्रिया शिक्षण घेऊन उच्च पदावर पोहोचलेल्या आहे. साधू संतांनी महत्त्वाचे योगदान या देशाला दिले व समाजाला अंधकारातून दूर करून प्रकाशात आणले.
यावेळी असंख्य महिला व नागरिक सहभागी झाले होते. कदमवाकवस्ती परिसरातील निवृत्त शिक्षक व शिक्षिकेचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालन पुष्पराज गुप्ता यांनी केले.


إرسال تعليق