सुनिल थोरात (संपादक)
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे : राज्यातील तलाठी परीक्षेतील अंतिम गुणवता यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. अंतिम निवड आणि प्रतीक्षा यादी मंगळवारी रात्री उशीरा जाहीर करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सरिता नरके यांनी दिली.
ही यादी उमेदवाराना पाहण्यासाठी भूमी अभिलेख च्या संकेतस्थळवर उपलब्ध आहे. परीक्षेची गुणवत्ता यादी याआधीच जाहीर करण्यात आली होती. आता अंतिम निवड यादी देखील जाहीर करण्यात आली आहे.
राज्यभरातून १० लाख ४१ हजार ७१३ परीक्षार्थीनी अर्ज दाखल केले होते. यापैकी ८ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली. या परीक्षेत एकूण प्रश्नांपैकी २८३१ प्रश्नांवर १६ हजार २०५ आक्षेप उमेदवारांकडून तलाठी भरती परीक्षा १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत तीन टप्प्यात ५७ सत्रांमध्ये घेण्यात आली होती.
परीक्षेची उत्तरसूची प्रकाशित करून उमेदवारांना प्रश्न किंवा उत्तरमुचीवायत काही आक्षेप, हरकती असल्याम त्या नोंदविण्यासाठी २८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत मुदत देण्यात आली होती. या आक्षेपापैकी एकूण वैध १४६ प्रश्नांसाठी घेतलेले ९०७२ आक्षेप परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीकडून योग्य ठरविण्यात आले. त्यानुसार सामान्यीकरण पद्धतीने परीक्षेमध्ये ४८ उमेदवारांना पेक्षा सामान्यीकृत गुण मिळाल्याचे दिसून आले.
२३ जिल्ह्यांची अंतिम निवड आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे.

إرسال تعليق