शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

आपल्या पाल्याचे बाल मानसशास्त्र या विषयावर कार्यशाळा संपन्न; अश्विन कुमार पत्की


 गजानन टिंगरे (प्रतिनिधी)

महाराष्ट्र पोलीस न्युज 


पुणे (बारामती) : आपल्या पाल्याचे बाल मानसशास्त्र या विषयावर अश्विनीकुमार पतकी सरांची ऍक्टिव्ह किड्स इंटरनॅशनल स्कूल सूर्यनगरी बारामती येथे बाल मानसशास्त्र विषयावर कार्यशाळा आयोजित केली होती. 


           या कार्यशाळेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांची प्रगतीत येणारा अडथळा कसा दूर करायचा त्यांच्या गुणवत्तेत कशी वाढ होईल. आपले मुल आजारी पडू नये म्हणून पा काय जबाबदारी आहे, मुलांची सायकॉलॉजी काय आहे, पालकांची काय जबाबदारी आहे, पालक मूल व स्कूल यांची संयुक्त काय जबाबदारी आहेत यांचा सर्व लेखाजोखा मांडला, 

  

             याप्रसंगी पालकांनी उत्स्फूर्त प्रश्न उत्तरांमध्ये सहभाग नोंदवला व आपली मुले व आपल्या मनावरील ताण मुलांच्या अभ्यासाकडे होणारे दुर्लक्ष याविषयी माहिती घेतली, मुलांचेमध्ये असलेली चांगली सवय तसेच बेशिस्तपणा, संस्कार, आपले राहणीमान त्याचप्रमाणे अभ्यास करण्याची वृत्ती त्याचे मातीमध्ये खेळण्याचे वय मातीमध्ये मिसळण्याचे वय, लॉन ठिकाणी चालणे, हॉटेलमध्ये जेवणे सखोल ज्ञान घेणे, नाचणे - खेळणे - बागडणे अशा सर्व वृत्तीमधून सर्व लहान मुले गेली पाहिजेत असे सरांनी आवर्जून नमूद केले, जेवढे शिक्षण महत्वाचं तेवढेच बालपणी महत्वाचं, आहे, मुले आपले अनुकरण करतात त्यामुळे पालकांनी सुद्धा शिस्त पाळणे गरजेचे असते, 



          पालकांनी मुलांच्या समोर भांडणे करू नयेत तसेच मुलांच्या समोर बेशिस्त वर्तन करू नये हे सुद्धा आपण कटाक्षाने पाळले पाहिजे, मुलांसाठी पालकांनी वेळ देणे गरजेचे आहे, पालकांनी आपल्या पाल्याच्या शाळेत मनापासून आले पाहिजे. शाळेतील प्रत्येक मीटिंगला उपस्थित राहणे तेवढेच गरजेचे आहे.


             मुलांच्या मनावर जास्त ओझे होऊ नये त्यासाठी पालकांनी त्यांच्या कवळ्या मनावर आपले विचार व्यक्त करू नये, त्यांना दररोज थोडे थोडे बोलत जा व त्यांच्या मनाचा विचार करत समतोल ठेवत आपले समाजप्रेम व देशप्रेम जागृत ठेवत चला मुलांना खोटे व खारेपणा यातील फरक समजला पाहिजे, त्याच्यात विचार करण्याची करण्याची क्षमता वाढीला लागली पाहिजे.


             याप्रसंगी सर्व पालकांनी पतकी सरांचे कौतुक व आभार मानले. सरांचा सत्कार राहुल बनकर सरांनी केला. शुभांगी बनकर प्राचार्य, करिष्मा पवार स्कूल इन्चार्ज, रेवती पाटील याप्रसंगी होते.



Post a Comment

أحدث أقدم