शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

"गुन्हेगाराकडून हडपसर तपास पथकाने १ रिक्षा आणि २ दुचाकी जप्त करून ३ गुन्हे उघडकीस केले."; वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे

गुन्हेगाराकडून हडपसर तपास पथकाने १ रिक्षा आणि २ दुचाकी जप्त करून ३ गुन्हे उघडकीस केले."; वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे 

 सुनिल थोरात (संपादक) 

महाराष्ट्र पोलीस न्युज 


पुणे (हडपसर) : वरिष्ठांनी अधिकारी यांनी पुणे शहरात वाहन चोरीचे गुन्ह्याचे प्रमाण वाढत असल्याने, त्याबाबत कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या. 


            वरीष्ठांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, यांनी तपास पथक अधिकारी / अंमलदार यांची मिटींग घेवून वाहनचोरीचे गुन्हे उघड करण्याबाबत सुचना दिल्या होत्या.


           त्यानुसार तपास पथक अधिकारी सपोनि अर्जुन कुदळे, पोउपनिरी महेश कवळे आणि अंमलदार सुशील लोणकर, अनिरूध्द सोनवणे, निखील पवार, प्रशांत दुधाळ, प्रशांत टोणपे, भगवान हंबर्डे, अमोल दणके, अमित साखरे, चंद्रकांत रेजितवाड यांनी केलेल्या तपासाआधारे आरोपी दिलीप शिवराज म्हेत्रे वय २४ वर्ष रा. गल्ली नंबर ११ संकेत विहार काळेपडळ हडपसर पुणे व विधीसंघर्षित बालक यांना ताब्यात घेतले.


            आरोपी दिलीप शिवराज म्हेत्रे यानी हडपसर पोलीस ठाणे हद्दीतुन २ मोटार सायकल व १ रिक्षा चोरी केल्याचे सांगीतले. त्याप्रमाणे १-रिक्षा, १-होंडा कंपनीची एक्स ब्लेड मोटारसायकल व १-होंडा अॅक्टीवा अशा किं. रू १,५०,०००/- च्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. आरोपीकडून हडपसर पोलीस ठाणेकडील ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत.


            सदरची कामगिरी ही अमितेश कुमार, मा. पोलीस आयुक्त पुणे शहर मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग व मा. आर राजा, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली अश्विनी राख मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, संतोष पांढरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, पंडीत रेजितवाड, पोनि. (गुन्हे), यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उप निरीक्षक महेश कवळे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, संदीप राठोड, सचिन जाधव, अनिरूध्द सोनवणे, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, भगवान हंबर्डे, अतुल पंधरकर, सचिन गोरखे, अमोल दणके, अजित मदने, चंद्रकांत रेजीतवाड, अमित साखरे, कुंडलीक केसकर, रामदास जाधव, यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली.

Post a Comment

أحدث أقدم