"सकल मराठा समाजाच्या वतीने हडपसर मध्ये रास्ता रोको करण्यात आले."मनोज जरांगे पाटलांच्या आवाहनाला प्रतिसाद देत रास्ता रोको आंदोलन..
--हडपसर पोलीस स्टेशन व वाहतूक पोलीस पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.--
सुनिल थोरात (संपादक)
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (हडपसर) : मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानुसार हडपसर मध्ये मांजरी फाटा चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
आंदोलन सकल मराठा समाज हडपसरच्या वतीने करण्यात आले रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतूक कोंडी झाली होती. एक मराठा लाख मराठा, मराठ्यांच्या ओबीसीमध्ये समावेश झाला पाहिजे सग्यासोयऱ्यांचा अध्यादेश निघाला पाहिजे. अशा घोषणा देत मराठा आंदोलन आक्रमक झाले होते. हडपसर पोलिसांनी ठेवलेल्या बंदोबस्तामुळे संतप्त झालेले वातावरण आटोक्यात आले.
मराठा समाजाला ओबीसीतील आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे उपोषण आंदोलन सुरू असताना महाराष्ट्र राज्य सरकारने दहा टक्के आरक्षण देऊन फसवणूक केल्याची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली व मराठ्यांचा ओबीसी मध्ये समावेश झाला पाहिजे, सगेसोयऱ्यांचा आद्यादेशाचे कायदयात रूपांतर झाले पाहिजे, या आग्रही मागणीसाठी महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करावे. असा समन्वय समितीने आदेश दिला होता. त्यानुसार हडपसर मधील सकल मराठा समाजाच्या वतीने मांजरी फाटा चौक विठ्ठल नगर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
हडपसरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांना मराठा समाजाच्या महिलांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.
आंदोलनात उच्चशिक्षित युवकही सहभागी झाले होते. हडपसर सकल मराठा समाजाच्या वतीने मांजरी फाटा चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलन प्रसंगी डॉक्टर वकील व उच्चशिक्षित युवकही सहभागी झाले होते. आंदोलन करताना मराठा समाजाच्या बांधवांनी एकही रुग्णवाहिका अडकणार नाही तसेच शालेय विद्यार्थी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेतली गेली.



إرسال تعليق