वादळी वाऱ्यासह दमदार पाऊस : भुमराळा वझर शिवारात काढणीच्या हंगामातपाऊसाचा दणका....
गंगाराम उबाळे (प्रतिनिधी)
महाराष्ट्र पोलीस न्युज
बुलढाणा : बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील भुमराळा व वझर आघाव येथे गहु शाळु हरभरा जमीन उद्ध्वस्त
रब्बी पिकांचा एन काढणीचा हंगाम सुरू झाला असतांना शेतकऱ्यावर पुन्हा एकदा संकटाचे मोठे आभाळ कोसळले मंगळवार २७ फेब्रुवारीला रात्री १ वाजता लोणार तालुक्यातील भुमराळा, वझर आघाव सह परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने तडाखा दिला.
यामध्ये गहू, हरभरा, कांदा, ज्वारी, शाळू, सह फळ पिकांची मोठी हानी झाली. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात अवकाळी पावसाने व वादळी वाऱ्यासह सर्वत्र दाणादान उडवली.
या अवकाळी ने अनेक पिके जमीन उद्ध्वस्त झाली त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. सलग दोन-तीन दिवसापासून गारपीट वादळी वारा सुरू असताना शेतकरी अडचणीत असताना मात्र लोकप्रतिनिधी बीबी महसूल मंडळात कुठेच दिसून आले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे
लोकप्रतिनिधी फक्त मतदानापुरताच वापर करून घेतात अशा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहेत.
येणाऱ्या काळात यांना धडा शिकवू अशी भावना काही शेतकऱ्यांनी पत्रकारांसमोर बोलून दाखवले आहे. शेतकऱ्यांना सरसकट मदत करून पिक विमा मंजूर करण्यात यावा अशी बीबी महसूल मंडळातील शेतकऱ्यांची मागणी आहे.

إرسال تعليق