गजानन टिंगरे (प्रतिनिधी)
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (इंदापूर) : अभियान ही संकल्पना संपूर्ण राज्यामध्ये राबविली जात आहे. या अभियानाला इंदापूर तालुक्यातील बोरी या गावापासून सुरुवात करण्यात आली आहे
या अभियानांतर्गत माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा गाव भेट द्यायला बोरी या गावापासून सुरुवात करण्यात आला आहे. यामध्ये गावातील प्रत्येक नागरिकाचे असणारे प्रश्न गावातील आरोग्य व्यवस्था शेतकरी वर्गाचे प्रश्न गावातील लोककल्याणकारी योजना आरोग्य व शैक्षणिक असणाऱ्या योजना याविषयी प्रत्यक्ष जनतेशी संवाद साधून हे अभियान राबवले जात आहे.
यामध्ये ही संकल्पना भारतीय जनता पक्षाच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रभर राबवली जाणार आहे. यावेळी गाव चलो अभियान या संकल्पनेच्या माध्यमातून गावातील नागरिकांसाठी असणाऱ्या सर्व कल्याणकारी योजना आणि प्रत्येक नागरिकाला कल्याणकारी योजनेचा फायदा कसा होईल याविषयी परिपूर्ण माहिती या गाव चलो अभियान या अंतर्गत संपूर्ण गावामध्ये दिली जात आहे यामध्ये इंदापूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि गावातील सर्व नागरिक उपस्थित होते.

إرسال تعليق