शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

महाराष्ट्रात तिसरी राजकीय आघाडी लोकसभेच्या ४८ जागा लढवणार; मिशन २०२४ लोकसभा; शक्ती ... प्रगती... विजय... : ओबीसी नेते संजय कोकरे


 सुनिल थोरात (संपादक)

महाराष्ट्र पोलीस न्युज 


मुंबई : महाराष्ट्रात जनता जनार्दन यांनी निवडून दिलेल्या आपापल्या लोकसभेचे खासदार, विधानसभेचे आमदार कोण कुठे जाणार याची खात्री नाही. या अनुषंगाने सर्व ओबीसीतील राजकीय पार्ट्यानी मिळुन राजकीय आघाडी केली आहे. आज ओबीसी समाज तसा आणखीन मागासलेलाच आहे. मुख्य प्रवाहात नाही. निर्णय प्रक्रियेत नसल्याने विकास खुंटला परंतु या राजकीय आघाडीच्या माध्यमातून ओबीसी समाजाला एक मजबूत राजकीय पार्टी म्हणून पाहता येईल असे ओबीसीचे  पार्टीचे संजय कोकरे यांनी सांगितले.



              त्या अनुषंगाने राजकीय आघाडीच्या वतीने काॅमन मीनमम प्रोग्राम जाहीर केला त्यामध्ये प्रामुख्याने जातीय जनगणना झालीच पाहिजे, बॅलेट पेपरवर निवडणुका पाहिजे, बेरोजगार, महागाई यावर ठोस पर्याय, धर्मनिरपेक्ष राष्ट निर्माण करणे, संविधानाला अभिप्रेत असलेला समाज निर्माण करणे व इतर समाजाच्या विविध मागण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आमच्या बरोबर आज जवळपास ३६ पार्ट्याची मजबूत राजकीय आघाडी झाली आहे. 



            महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा तिसरी राजकीय आघाडी लढविणार. जातीनिहाय जनगणना हा प्रमुख मुद्दा घेऊन जनतेच्या समोर जाणार - संजय धाकु कोकरे नेते तिसरी राजकीय आघाडी




            तिसरी राजकीय आघाडी गठबंधनचा जाहीरनामा तयार करण्यासाठी सर्व सहभागी पक्ष अध्यक्षांची बैठक संजय कोकरे यांच्या घाटकोपर निवासस्थानी बोलवणार आहे. सर्व पक्षाध्यक्षांना विंनती करतो तारीख ठरविण्यासाठी, बैठकीचे नियोजन करण्यासाठी किती राजकीय पार्ट्याचे अध्यक्ष, नेते, प्रवक्ते येणार आहेत यासाठी ओबीसी नेते संजय कोकरे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. 


       ..यामध्ये खालील प्रमाणे सामाविष्ट असलेल्या राजकीय पार्ट्या..


1) सरदार वल्लभभाई पटेल पार्टी

2) ओबीसी एन. टी पार्टी

3) राष्ट्रीय जनसेवा पक्ष

4) गोंडवाना महासभा

5) राष्ट्रीय पावर पार्टी

6) जन सत्यपंथ पार्टी

7) स्वंतत्र अभिव्यक्त पार्टी

8) मदरलेन्ट नॅशनल पार्टी

9) भारतीय जनाधार पार्टी

10) देश जनपथ पार्टी

11) गरीबी मुक्त भारत पार्टी

12) समाजवादी चंद्रशेखर पार्टी

13) गुजरात लोकतंत्र पार्टी

14) संघर्ष सेना

15) वन्दे मातरम् सेना

16) हिंन्दवी सेना

17) आम जनता पार्टी

18) आगरी सेना

19) मीम सेना

20) इंडियन सोशलिस्ट रिपब्लिकन असोशिएट

21) ओडिसा प्रगती दल

22) समाजवादी जनता पार्टी

23) देश जनहित पार्टी

24) हिन्दुस्तान जनता पार्टी

25) न्यू राष्ट्रीय समाज पार्टी

26) राष्ट्रीय जनक्रांती पार्टी

27) राष्ट्र निर्माण पार्टी

28) नेशनल सोशालिस्ट पार्टी

29) लोकराज्य जनता पार्टी

30) भारतीय प्रजा सुरक्षा पक्ष

31) चंद्र सेना पार्टी

32) कामगार किसान पार्टी

33) यशवंत संघर्ष सेना

34) लोकशाही संघटना

35) ऑल इंडिया SC, ST,

OBC मायनोरीटी महासंघ



Post a Comment

أحدث أقدم