अवैध धंद्यांना ऊत, विद्यार्थी यांचे शिक्षणावर परिणाम, उपोषणाचा इशारा : मलकापूर पांग्रा
गंगाराम उबाळे (प्रतिनिधी)
महाराष्ट्र पोलीस न्युज
बुलढाणा : मलकापूर पांग्रा प्रतिनिधी साखरखेर्डा पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या मलकापूर पांग्रा येथे अवैध धंद्यांनी कळस गाठला असून विद्यालयाच्या जवळ धाब्यावर देशी - विदेशी दारूची खुलेआम विक्री होत आहे.
वरली जुगार ह्या धंद्याला पोलीस प्रशासनाने खुलेआम परवानगी दिली आहे का असे नागरिकांमध्ये चर्चा केली जात आहे.
या अवैध असलेल्या ठिकाणी असलेल्या जुगार व देशी विदेशी मद्याची ग्रामस्थांनी गंभीर दखल घेत. ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मलकापूर पांग्रा हे गाव अवैध व्यवसायासाठी जणू केंद्रबिंदू ठरत असून येथील अवैद्य व्यवसायिकाच्या मर्जीनुसार व्यवसाय केला जात आहे का प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. पाठीमागील काही दिवस हे धंदे बंद करण्यात आले होते. मात्र मटका किंगने चिरीमिरीत वाढ केली आहे का असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. तसे पाहता संपुर्ण महाराष्ट्रात जुगार व अवैध धंदे बंद असताना जुगार व अवैध धंदे खुलेआम सुरू झाल्याने मलकापूर पांग्रा वासी आक्रमक झाले आहे.
जुगार व मद्य विक्री धंदे बंद न झाल्यास दि १ मार्च पासून साखरखेर्डा पोलीस ठाण्यासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा महाराष्ट्र सेनेचे जिल्हाप्रमुख भारत साळवे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे.
साखरखेर्डा पासून मलकापूर पांग्रा हे अठरा किमी अंतरावर आहे या ढाब्यावर देशी विदेशी मद्याची विक्री केली जाते तर बैल बाजारात वरली जुगार चालविला जातो. पोलीस प्रशासन मात्र दरडोई तिन लाख रुपये माया गोळा करण्यात मश्गूल आहे. असे निवेदनात म्हटले आहे.
परिणामी शालेय विद्यार्थी याकडे वळल्याच्या भितीने विद्यार्थी यांच्या शिक्षणाची होळी होण्यासाठी जणू विडाच सबंधितांनी उचलल्याचे दिसून येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मटकाकिंगची दहशत असल्याचे यावरून दिसून येत आहे. येथील मटका किंग हा अनेकदा तडिपार झाला आहे. त्याचेवर विविध गुन्हे दाखल असताना पोलीस तथा गांवातील आम जनतेत आपली दहशत निर्माण करीत असताना वरिष्ठांनी याचा बंदोबस्त करावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
अवैध धंद्यासह वनविभागाला हाताशी धरून अवैध सागवाणी लाकडाची कत्तल करून बिनधास्तपणे विक्री करीत आहे. या संदर्भात वनविभागाकडे तशी तक्रार दाखल केली आहे. -शे सत्तार शे नवाज सामाजिक कार्यकर्ते मलकापूर पांग्रा मलकापूर पांग्रा परिसरात अवैध व्यवसाय व अवैद्य सागवान व्यवसाय पूर्णपणे बंद करावे. असा ठराव ग्रामपंचायत मलकापूर पांग्रा घेणार आहे. भगवानराव उगले. उपसरपंच मलकापूर पांग्रा....



إرسال تعليق