शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

शेतजमिनीच्या मोजणीसाठी भूकरमापक व सहकारी लाचलुचपतच्या जाळ्यात...

 ...शेतजमिनीच्या मोजणीसाठी भूकरमापक व सहकारी लाचलुचपतच्या जाळ्यात...


सुनिल थोरात (संपादक)

महाराष्ट्र पोलीस न्युज 


पुणे (शिरुर) : शिरूर येथील भूकरमापक शिवराज बंडगर व खाजगी इसम अमोल कदम याला लाच घेताना बुधवार दि.६ मार्चला लाचलुचपत विभागाने जाळ्यात पकडले.

               तक्रारदार शेतकरी यांची मौजे धामारी ता. शिरुर येथील शेतजमिनीची मोजणी होती. यासाठी शेतकरी यांनी शासकीय फी भरलेली होती. मात्र प्रत्यक्ष मोजणीवेळी भूकरमापक शिवराज बंडगर यांच्या समवेत असलेला अमोल कदम याने शेतकऱ्याला ५०००/- रुपये लाच मागितली. त्यामुळे तक्रारदार शेतकऱ्यांने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.

             दरम्यान तडजोडअंती ३०००/- रुपये ठरले. या लाच मागणीला व लाच स्वीकारायला भूकरमापक बंडगर यांनी प्रोत्साहन दिले. त्यामुळे तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना भूकरमापक बंडगर व खाजगी इसम अमोल कदम यांना लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे.

          सदर प्रकरणाचा तपास एसीबीचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रवीण निंबाळकर करत आहे.

Post a Comment

أحدث أقدم