शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

विज वितरणाचा उपकार्यकारी अभियंता लाच घेताना रंगेहाथ.... उरुळी कांचन

 ..विज वितरणाचा उपकार्यकारी अभियंता लाच घेताना रंगेहाथ.... उरुळी कांचन..

सुनिल थोरात (संपादक)

महाराष्ट्र पोलीस न्युज 


पुणे : विज वितरणाचे लाईट पोल दुसरीकडे शिफ्टींगची परवानगी देण्यासाठी ठेकेदाराकरून दोन हजारांची लाच स्वीकारताना महावितरणाच्या उरुळी कांचन (ता. हवेली) उपविभागीय कार्यालयातील उपकार्यकारी अभियंता धम्मपाल पंडित यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी दि. ४ तारखेला दुपारी १ वाजण्याच्या सुमारास रंगेहात पकडले. 


              ही घटना ताजी असतानाच, आता जमिनीच्या क्षेत्राची नोंद सातबारा उताऱ्यावर लावण्यासाठी दोन हजारांची लाच स्वीकारताना राजगुरुनगरच्या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.


              एकाच दिवशी दोन मोठ्या कारवाया एसीबी कडून झाल्यामुळे पुणे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. या कारवाई शासकीय अधिकारी सापडत असतील तर किती भ्रष्ट कारभार चालू आहे. अशी उरुळी कांचन परिसरातील नागरिकांकडून चर्चा होत आहे.


         बबन कारभारी लंघे (वय ४६, तलाठी, राजगुरुनगर तलाठी कार्यालय, ता. खेड, जि. पुणे (वर्ग ३) असे रंगेहात पकडलेल्या तलाठ्याचे नाव आहे. याप्रकरणी एका ३७ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व त्यांच्या मित्राची पत्नी असे दोघांचे भागीदारीमध्ये एक गुंठा क्षेत्र सामाईकमध्ये खरेदी केले आहे. त्या जमिनीच्या क्षेत्राची नोंद सातबारा उताऱ्यावर करण्यासाठी लोकसेवक बबन लंघे यांनी तक्रारदार यांच्याकडे १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राजगुरुनगर तलाठी कार्यालयात सापळा रचला होता. तेव्हा तक्रारदार यांच्याकडून सात-बारा उताऱ्यावर नोंद करुन, उतारा देण्यासाठी तडजोडीअंती २ हजार रुपयांची लाच देण्याचे ठरले. हीच लाच स्वीकारताना लोकसेवक बबन लंघे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. आरोपी लंघे याच्याविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु असून, पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रणेता सांगोलकर करत आहेत.


Post a Comment

أحدث أقدم