शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

२०२४ लोकसभेचा रणसंग्राम कोण बाजी मारणार...मतदार हा मतदाना पुरताच राहणार का? नेता जनतेशी व पक्षाशी एकनिष्ठ राहणार का? संपादकीय लेख....

 

....२०२४ लोकसभेचा रणसंग्राम कोण बाजी मारणार...मतदार हा मतदाना पुरताच राहणार का? नेता जनतेशी व पक्षाशी एकनिष्ठ राहणार का? संपादकीय लेख....

सुनिल थोरात (संपादक)

महाराष्ट्र पोलीस न्युज 


पुणे : महाराष्ट्रा बरोबर भारत भर लोकसभेचे पडघम वाजले महाराष्ट्रात भाजप, काॅग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट), शिवसेना (शिंदे गट), महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे), वंचित बहुजन आघाडी, असे अनेक पक्ष लोकसभेला आपापल्या चिन्हावर उमेदवार देतील व निवडून ही आणतील.


          पूर्वी या सर्व पक्षातून स्व:ताचे उमेदवार देऊन पक्ष आपापल्या विचारांचे सरकार आणत कार्यकर्ते ही एकनिष्ठेने आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत असत ही वस्तुस्थिती होती.


          पक्षाची एक विचारधारा होती. पक्ष आणि पक्षाच्या प्रमुख नेताचा शब्द अंतिम असायचा याच्या आधारे दिल्लीत व राज्यात सरकार चालत असत पक्षश्रेष्ठीचा शब्द कोणीच डावलत नसतं. पक्ष व नेता हा लोकशाही च्या आधारे सरकार चालवत असत. समाजकारणात व राजकारणात दोन्ही भिन्न असली तरी समाजाचा विकास करण्याच्या उद्देशाने सत्तेतील व विरोधातील पक्ष, नेते सर्वसामान्यांचा विकास साधत जनतेचा केंद्रबिंदू बनत असत.


          परंतु काही वर्षांपूर्वीची परिस्थितीत आणि आत्ताच्या परिसरातील खुप फरक दिसून येतो. पक्षात निवडून आलेले नेते आपली टर्म पुर्ण होण्याआधीच नेते दुसर्या पक्षात जातात. आणि जनता-जनार्दनाने दिलेल्या जनमताला उध्वस्त करतात.  लोकशाही पार चिरडून टाकतात. सर्व सामान्यांच्या अपेक्षा भंग करतात. या अशा विचाराने राजकारणाची पातळी खालावल्याचे निदर्शनास येते. युवा पिढीने मतदान कोणाला करायचे कोण ठाम राहणार कोण कुठल्या पक्षात जाणार याचा कुठलाही अंदाज मतदार याला नाही.


          ‌‌ राजकीय पक्षात काही पक्षाचे चिन्ह बदलले काही पक्षाचे राजकारणाची दिशा बदलली. काही पक्षांची विचारधारा बदलली. उमेदवारीसाठी किंवा अस्तित्वासाठी काहींनी पक्ष बदलला तर काहींनी बदला घेण्यासाठी या पक्षातून त्या पक्षात पलायन केले याचा परिणाम मतदारांनी कोणाला मतदान करायचे आणि का?


          या बदललेल्या सर्व समीकरणांनी कुठला पक्ष बाजी मारणार कोण निवडून येणार, कोण घरी बसणार हा येणारा काळच ठरवेल. निवडन येणारा नेता पक्षाशी किंवा जनतेशी एक निष्ठ राहणार का? पुन्हा जनता-जनार्दन चा उपयोग फक्त आणि फक्त मतदाना पुरताच होणार. हा येणारा काळच ठरवणार.

Post a Comment

أحدث أقدم