शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

निवडून बिनविरोध व्हावी अशी जनतेची इच्छा; आमचे प्रामाणिक प्रयत्न जनतेने पाहिलेत : सभापती दिलीप काळभोर....

 ...निवडणुकीत सभासद मंडळी विरोधकांना धडा शिकवणार... सभासद दिलीप काळभोर


सुनिल थोरात (संपादक)

महाराष्ट्र पोलीस न्युज 


पुणे (हवेली) : थेऊर येथील यशवंतची निवडणूक जाहीर झाल्यापासूनच बंद असलेल्या कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी सर्व शेतकरी व सभासद बांधवांची इच्छा होती. 


              निवडणूक झाली तर आपापसातले गट तट यामुळे कारखाना सुरू करण्यात अडचणी येऊ शकतात. हे ओळखूनच माजी जिल्हा परिषद सदस्य माधव आण्णा काळभोर महाराष्ट्र केसरी पैलवान राहुल काळभोर, व सभापती दिलीप काळभोर सह इतर सभासदांनी कारखान्याची निवडून बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेतला.


             कारखाना सुरू करायचा असेल तर गट, तट, भेदभाव विसरून सर्व समावेशक सर्वपक्षीय बिनविरोध संचालक मंडळ निवडून जाणे गरजेचे आहे. याची जाणीव आम्हाला झाली म्हणून निवडणूक आम्ही स्वतःपासून सुरुवात केली. लोणी गावातील पारंपरिक विरोधक असताना सुद्धा माधव आण्णा काळभोर व आम्ही सर्व मंडळी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी संपूर्ण तालुक्यात गेली १५ दिवस सलग अनेक बैठका घेतल्या. प्रामुख्याने गुलमोहर कार्यालय येथील "निवडणूक बिनविरोध करण्यासाठीचे चर्चासत्र" आयोजित केले. ज्यामध्ये उमेदवारी अर्ज भरलेले सर्व इच्छुक उमेदवार तालुक्यातील सर्व नेते मंडळी व शेतकरी सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.


            निवडणूक बिनविरोध झाली तर याचे श्रेय आम्हाला जाईल म्हणून तालुक्यातील दोन अति महत्वकांक्षी नेते मंडळींनी प्रत्येक मीटिंगमध्ये मुद्दामून गोंधळ घालून आमच्या प्रयत्नांना खो घातला. स्वतःचे राजकीय अस्तित्व सिद्ध करण्यासाठी यांनी संपूर्ण कारखान्याच्या २१००० हजार सभासदांवर ही निवडणूक जाणूनबुजून लादली.



         या सर्व बिनविरोध प्रक्रियेमध्ये दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार राहुल दादा कुल, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप दादा कंद, माऊली आबा कटके यांनी मध्यस्थी करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आमच्या समवेत माजी आमदार जगन्नाथ बापू शेवाळे, प्राचार्य के डी कांचन, माजी आमदार बापूसाहेब पठारे, देविदास भन्साळी, प्रकाश मस्के, सुरेश घुले, प्रताप गायकवाड, सोपान कांचन, विकास दांगट, महादेव कांचन, राजीव घुले, पांडुरंग काळे, संदीप भोंडवे, माणिकराव गोते, रोहिदास उंद्रे रामभाऊ कुंजीर, मारुती कुंजीर, तात्यासाहेब काळे, महेंद्र पठारे कुशाभाऊ गावडे, रघुनाथ चौधरी, बाबासाहेब काकडे, राजेंद्र टिळेकर, राजाराम कांचन, गुलाब चौधरी, तुकाराम पवार, सुदर्शन चौधरी सुभाष आप्पा काळभोर, विलास अण्णा काळभोर इत्यादी तालुक्यातील अनेक प्रतिष्ठित नेते मंडळींनी बिनविरोध करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. सकाळी नऊ ते रात्री बारा अशा बारा ते पंधरा तास बैठका घेतल्या विरोधकांची मनधरणी केली व वेळप्रसंगी विनवणी केली. उमेदवारी माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आमचे प्रयत्न सुरू होते तरी काही नतदृष्ट मंडळींनी यामध्ये डाव साधला व ही निवडणूक सभासदांवर लादली.



          तालुक्यातील सर्व जनतेने आमचे प्रयत्न पाहिलेले आहेत. जनता सुज्ञ आहे. त्यामुळे या निवडणुकीत सभासद मंडळी मतदान करुन यांना धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही. यात शंका नाही. 



रयत सहकार पॅनलला प्रचंड बहुमताने सभासद विजयी करणार असा मला विश्वास आहे असं सभापती दिलीप काळभोर यांनी सांगितले.



Post a Comment

أحدث أقدم