शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

आखील भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे जिल्ह्याच्या वतीने उरुळी कांचन येथे होणार राज्यस्तरीय कवि संमेलन : प्रा. सुरेश वाळेकर


 पुणे (हवेली) (प्रतिनिधी) : पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन येथे २८ मे ला राज्यस्तरीय कविसंमेलनाचे आयोजन व नियोजन करण्यासंदर्भात पुणे जिल्ह्यातील हवेली, बारामती, पुरंदर, शिरुर, दौंड आणि इंदापूर तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी सदस्य नेचर नेस्ट ट्युरिझम गार्डन कोरेगाव मुळ या निसर्ग रमणीय अशा ठिकाणी कवि संमेलन घेण्यासंदर्भात महत्वपूर्ण मिटिंगचे आयोजन करण्यात आले.

 

            आखील भारतीय मराठी साहित्य परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रा.सुरेश वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक बोलावण्यात आली.


          महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातुन नामवंत कवि साहित्यिक, लेखक, पाठ्यपुस्तक कवि महोदयांचे उरुळी कांचन नगरीमध्ये आगमन होणार आहे. व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक, प्रमुख मान्यवर पाहुणे, प्रसार माध्यम व  पत्रकार बंधू आणि सन्मानित गुणवंत पुरस्कार्थी सोहळा संपन्न होणार आहे.


          या सर्व कार्यक्रमाचे पुणे जिल्हयातील हवेली अध्यक्षा वंदना ढोले,ज्ञशिरुर तालुकाध्यक्ष रुपाली भोरकडे, पुरंदर तालुका अध्यक्षा प्रतिमा गुरव, दौंण्ड तालुका अध्यक्ष प्रा. दिनेश पवार, इंदापूर तालुका अध्यक्ष पुजा माळी यांच्या सहकार्याने हे राज्यस्तरीय कवि संमेलन यशस्वी होईल असे प्रास्ताविकात मार्गदर्शन करताना प्रा.सुरेश वाळेकर यांनी सांगितले.


             या नियोजित मिटिंगला अनेक निमंत्रित कवि सदस्य मंडळी उपस्थित राहिली यामध्ये रफिक इनामदार, प्राध्यापिका शुभांगी धुमाळ -उपाध्यक्षा हवेली, ज्ञानेश्वर ताठे- कार्याध्यक्ष हवेली, प्रमिला कांचन - सचिव हवेली तालुका, सानिका ठाणगे- महिला प्रवक्ता, करण दौड - संपर्क प्रमुख हवेली, वनिता जाधव महिला अध्यक्षा बारामती तालुका, महाबली मिसाळ - उपाध्यक्ष शिरुर तालुका, पुजा मोरे- कार्याध्यक्षा शिरुर तालुका, आदी कविवर्य उपस्थित राहिले होते.

Post a Comment

أحدث أقدم