....साद फाऊंडेशन इंदापूर च्या वतीने होतकरू युवक युवतींना संगणक प्रशिक्षणासाठी आर्थिक मदत....
डॉ गजानन टिंगरे (पुणे संपादक)
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (इंदापूर) : साद फाऊंडेशन इंदापूर या बहुद्देशीय धर्मांदाय संस्थेच्या वतीने होतकरू युवक युवतींना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त MS-CIT या संगणक प्रशिक्षणासाठी आर्थिक मदत करण्याचे नुकतेच संस्थेच्या वार्षिक बैठकीत ठरले होते.
त्यानुसार मंगळवार दि.२ एप्रिल २०२४ रोजी वालचंदनगर येथे श्री वर्धमान विद्यालयाचे उपप्राचार्य रामनाथ नाकाडे सर यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला असून जास्तीत जास्त गरजवंत होतकरू युवक युवतींना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
यावेळी संस्थेचे प्रतिनिधी ऋतुज वनसाळे हे उपस्थित होते.

إرسال تعليق