शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

यशस्वी सापळा कार्यवाही हदगाव येथील दुय्यम निबंधक यांचेवरती 1,99,000/- रु. नोंदणी व मुद्रांक फी सह लाचेची मागणी केली केल्याचा गुन्हा दाखल

 

यशस्वी सापळा कार्यवाही

हदगाव येथील  दुय्यम निबंधक यांचेवरती 1,99,000/- रु. नोंदणी व मुद्रांक फी सह लाचेची मागणी केली केल्याचा गुन्हा दाखल

प्रतिनिधी गुलाब शेख 

   आरोपी:-1. बालाजी शंकरराव उत्तरवार, दुय्यम निबंधक श्रेणी 1, उप-निबंधक कार्यालय, हदगाव (वर्ग 3), 

2. समीउल्ला अजमतउल्ला शेख उर्फ शमी (मुद्रांक विक्रेता/खाजगी इसम)

3. शेख अबूबकर करीम सिद्दिकी उर्फ बाबू (मुद्रांक विक्रेता या आरोपींनी दि. 12/07/2024 रोजी  1,99,000/-- मुद्रांक फिस सह लाचेची मागणी केली तडजोडीअंती लाचेची मागणी1,95,000/- रु. (1,13,400/- रु. नोंदणी व मुद्रांक ची पावती व 81,600/- रु. लाच रक्कम यातील तक्रारदार यांनी मौ. हदगाव येथील गट क्रमांक 256/2 मध्ये 20 गुंठे शेतजमीन खरेदी केली होती. दि. 08/07/2024 रोजी तक्रारदार नमुद शेत जमीनीच्या रजिस्ट्री करिता उप निबंधक कार्यालय, हदगाव येथे जावून लोकसेवक उत्तरवार, दुय्यम निबंधक यांना भेटले असता त्यांनी रजिस्ट्री करण्यासाठी 1,99,000/- रु. नोंदणी व मुद्रांक फी सह लाचेची मागणी केली.

 न

मुद शेतीचे रजिस्ट्री करिता लोकसेवक मागत असलेले 1,99,000/- रु. नोंदणी व मुद्रांक फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्याचे तक्रारदार यांची खात्री झाली व त्यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने, त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड येथे 

दि. 12/07/2024 रोजी याबाबत तक्रार दिली. 

       नमुद तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेडकडून लाच मागणीची पडताळणी केली असता, आलोसे क्र. 1) बालाजी उत्तरवार यांनी तक्रारदार यांना नमुद शेतीच्या रजिस्ट्री करिता नोंदणी व मुद्रांक फी सह असे म्हणून पंचासमक्ष 1,99,000/- रूपयाची मागणी केली. तेव्हा तक्रारदार यांनी नमुद रक्कम कमी करण्यास विनंती केली असता लोकसेवक यांनी 4,000/- रु. कमी द्या, असे म्हणून तडजोडी अंती 1,95,000/- रु. लाचेची मागणी करून लाच रक्कम आरोपी क्र. 2) समीउल्ला अजमतउल्ला शेख याचेकडे देण्यास सांगितले.

     त्यावरून करण्यात आलेल्या सापळा कार्यवाही दरम्यान आरोपी क्र. 2) समीउल्ला यांनी तक्रारदार यांचेकडून लाचेची रक्कम 1,95,000/- रु. उप निबंधक कार्यालय, हदगाव चे आवारात स्विकारून नमुद रक्कम आरोपी क्र. 3) शेख अबुबकर याचेजवळ दिली. त्यानंतर तक्रारदार यांना नोंदणी व मुद्रांक फिस भरल्याची   1,13,400/- रु. ची पावती दिली आहे. नमुद प्रकरणात लोकसेवक उत्तरवार यांनी नोंदणी व मुद्रांक फीचे नावाखाली तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष 81,600/- रु. लाचेची मागणी करून नमुद रक्कम आरोपी क्र. 2) समीउल्ला यांचेद्वारे स्विकारली. नमुद लाच रक्कम आरोपी क्रमांक 3) यांनी स्वतःचे ताब्यात ठेवून गुन्हयास प्रोत्साहन दिले आहे. आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून पोलीस स्टेशन हदगाव, जि.नांदेड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मार्गदर्शक डॉ.राजकुमार शिंदे, भापोसे पोलीस अधीक्षक  अँटी करप्शन ब्युरो, नांदेड परिक्षेत्र

        मो.क्र. 9623999944पर्यवेक्षण अधिकारी  श्री प्रशांत पवार

        पोलीस उप अधीक्षक,

        अँटी करप्शन ब्युरो, नांदेड

        मो.क्र. 9870145915

सापळा व तपास अधिकारी:-प्रिती जाधव 

        पोलीस निरीक्षक,

        अँटी करप्शन ब्युरो, नांदेड सापळा कारवाई पथक:अँटी करप्शन ब्युरो, नांदेड टीम

-------------------------------------------------                                                                                                                 नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही लोकसेवकाने, शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ खालील क्रमांकावर संपर्क साधावा.


दुरध्वनी 02462-253512 

टोल फ्रि क्रं. 1064

2 تعليقات

إرسال تعليق

أحدث أقدم