महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 - नांदेड प्रतिनिधी सतीश वाघमारे
मजुरी करुन घराकडे परतत असताना पिकपची धडक बसल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली सदरील घटना ही दि.१२ जुलै २०२४ रोजी घडली आहे. तालुक्यातील सकनूर येथे राहणारा मयत - दत्ता व्यंकट नागरवाड वय - २८ वर्ष हा तरुण पिंपळकुंठा येथे मजुरी करून रिक्षाने घरी येत असताना झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला आहे. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार - वार- शुक्रवार दि.१२ जुलै २०२४ रोजी सकनुर येथील सात ते आठ व्यक्ती पिंपळकुंठा येथे मजुरी करण्याकरिता गेले होते. दिवसभर काम करून रात्री ८च्या सुमारस आपल्या मूळ गावी सकनूर येथे रिक्षाने निघाले. बाराहाळीहुन जाहुरकडे जाणाऱ्या एम. एच. १२ आर एन. ०३०३ या क्रमांकाच्या पिकअपने चिंदलदेवी फाटा येथील वळणावर रिक्षाला कट मारण्याचा प्रयत्न केला.यात सकनूर येथील रिक्षात समोरील सीटवर बसलेल्या दत्ता नागरवाड या तरुणाच्या उजव्या पायाला पिकपची जोरात धडक बसली. व युवकास पिकपने ७ मीटर अंतर फरफटत नेले.त्यात युवकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
तर रिक्षातील किरण गौतम गायकवाड या तरुणास ही गंभीर इजा पोहोचली. त्यामुळे त्यास उपचाराकरिता बाराहाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्या कारणास्तव त्याला पुढील उपचाराकरिता मुखेड येथे हलवण्यात आले आहे. तर पुढील कारवाई सुरू असल्याचे पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे यांनी आमुच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.
إرسال تعليق