शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

श्री. संदीप नामदेव ढिकले (संदीपसागर) यांना संस्कृत विषयात डॉक्टरेट पदवी बहाल.


श्री. संदीप नामदेव ढिकले (संदीपसागर) यांना संस्कृत विषयात डॉक्टरेट पदवी बहाल.

 प्रतिनिधी रंजित दुपारगुडे

पुण्यातील एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी येथील पीस स्टडीज विषयविभागात कार्यरत असलेले, डॉ. संदीप नामदेव ढिकले (संदीपसागर) यांनी दिनांक २२/७/२०२४ रोजी त्यांचा पीएच.डी. शोधप्रबंध डेक्कन कॉलेज पी.जी.आर.आय. अभिमत विद्यापीठातील संस्कृत आणि कोशशास्त्र या विभागात यशस्वीपणे सादर केला असूनत्यांना  'डॉक्टर' ही उपाधी प्राप्त झाली आहे. सदर संशोधन हे पं. किशोर लिमये रचित 'अग्निसंभवम्' या डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यावरील 'संस्कृत' महाकाव्यावर आधारित आहे. 
संस्कृत साहित्यशास्त्रातील पारंपरिक आणि नवीन संकल्पनांचा तौलनिक अभ्यास असलेला हा प्रबंध संस्कृत साहित्यसमीक्षाप्रकारास मोलाची भर आहे असे संशोधन मार्गदर्शक प्रा. डॉ. काशिनाथ होता आणि परीक्षक प्रा. डॉ. विनया क्षिरसागर यांनी याप्रसंगी म्हटले आहे. आधुनिक वैज्ञानिक संकल्पनांचा संस्कृत भाषेतील प्रयोग आणि असंख्य नव्याने तयार केलेल्या संस्कृत शब्दांचे भांडार असलेल्या महाकाव्यावरील  नावीन्यपूर्ण असा हा प्रबंध असल्याचे उपस्थित श्री. विनोद जमदाडे यांचे प्रतिपादन आहे.

Post a Comment

أحدث أقدم