शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

अवैध दारू धंदे बंद करावे जिल्हा कार्याअधक्ष ज्योत्स्नाताई पाटील यांची मागणी



अवैध दारू धंदे बंद करावे जिल्हा कार्याअधक्ष ज्योत्स्नाताई पाटील यांची मागणी

उत्तर सोलापूर प्रतिनिधी राजकुमार तगारे

सोलापुर : अवैध दारू धंदे बंद करावे,पती दारूच्या व्यसनाच्या आहारी गेल्याने बहिणींच्या प्रपंचाची राखरांगोळी होते आहे.अनेक महिलांना यामुळे बेघर व्हावे लागले. या पार्श्वभूमीवर संबंध जिल्हाभरात दारूबंदीची विशेष मोहीम राबवून महिलांचे त्यांचे संसार वाचवावेत, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी महिला आघाडी व जावा संघटनेतर्फे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना देण्यात आले आहे.
सोलापूर जिल्ह्यात तयार होणारी हातभट्टी दारू निर्मिती व विक्री बंद करण्यासाठी ग्रामीण पोलीसांनी 'ऑपरेशन परिवर्तन' सुरु केले आहे. त्यातून सुरूवातीला बदल पाहायला मिळाला, पण काही महिन्यांपासून पुन्हा हातभट्टया पेटल्याची स्थिती आहे.गावात सहजपणे हातभट्टी दारू मिळू लागल्याने अनेकजण व्यसनाच्या आहारी गेले आहेत. अनेक गावांमध्ये दारू बंदीचे ठराव होऊनही त्याठिकाणी दारू विक्री सुरू आहे.त्या गावातील महिलांनी दारू बंदी संबंधीचे निवेदनेही स्थानिक पोलीसांना दिली आहेत.पण अपेक्षित बदल त्याठिकाणी झालेला दिसत नाही. दरम्यान, पोलिस अधीक्षकांनी वैयक्तिक लक्ष घालून दामिनी पथक प्रत्येक तालुक्यात बस स्टॉप, कॉलेज अशा सार्वजनिक ठिकाणी कार्यरत करावे, अशीही मागणी राष्ट्रवादी ज्योस्त्ना पाटील, लता ढेरे अमोल पाटील,दशरथ पवार,तुकाराम साठे यांनी निवेदनाद्वारे केली आऐहे.



चौकट

*शाळा-महाविद्यालयांबाहेरच गुटखा,मावा विक्री*
शाळा किंवा महाविद्यालयांच्या १०० मीटर परिसरात अवैध धंदे विशेषतः गुटखा,मावा विक्री करण्यावर निर्बंध आहेत.अशा सर्व अवैध व्यवसायिकांविरूद्ध पोलिसांकडून ठोस कारवाई अपेक्षित आहे. मात्र सोलापूर शहर असो वा जिल्ह्यातील मोठी शहरे (तालुक्याची ठिकाणे) आणि मोठी गावे, याठिकाणी पानटपरींच्या माध्यमातून मावा,गुटखा,सिगारेटची खुलेआम विक्री सुरू असल्याचे चित्र आहे. अशा अवैध व्यवसायिकांविरूद्ध आता पोलिस ठोस कारवाई करतील का,याकडे संपूर्ण जिल्हावासियांचे लक्ष लागले

Post a Comment

أحدث أقدم