शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

इंदापूर तहसिल कार्यालयात पुरवठा विभागात दलालांचा सुळसुळाट.. कर्मचारी मालामाल .. लहुजी शक्ती सेना जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ जगताप आंदोलन करणार...



इंदापूर तहसिल कार्यालयात पुरवठा विभागात दलालांचा सुळसुळाट.. कर्मचारी मालामाल .. लहुजी शक्ती सेना जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ जगताप आंदोलन करणार...

इंदापुर प्रतिनिधी /अतुल सोनकांबळे

दिनांक ६/८/२०२४
इंदापूर तहसिल कार्यालय (पुरवठा विभाग) येथील पुरवठा निरीक्षक यांच्या कृपाआशिर्वादाने कार्यरत झिरो कर्मचारी तथा उमेदवार यांच्यावर कारवाई करून त्यांची हकालपट्टी करण्यात यावी या संदर्भात आज लहुजी शक्ती संघटनेचे वतीने इंदापूर तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले.

इंदापूर तहसिल कार्यालयामधील पुरवठा विभाग हा अत्यंत महत्त्वाचा विभाग असून तालुक्यातील नागरिक पुरवठा विभागांमध्ये नवीन, जीर्ण, गहाळ, स्थलांतरित, शिधापत्रिका घेणे. शिधापत्रिकेतील नाव कमी करणे, वाढवणे, मयताचे नाव कमी करणे, याकरता सातत्याने पुरवठा शाखा इंदापूर येथे येत असतात.


सध्याच्या परिस्थितीमध्ये शिधापत्रिका ऑनलाईन झालेल्या आहेत. सदर शिधापत्रिका ऑनलाईन करत असताना त्यामध्ये असंख्य अशा चुका व त्रुटी सदर शिधापत्रिका ऑनलाईन करणाऱ्यांनी केलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्तापाला तोंड द्यावे लागत आहे. तसेच शिधापत्रिकेतील नाव कमी करणे, नाव वाढवणे अथवा शिधापत्रिकेला मंजुरी घेणे हे सर्व प्रकार ऑनलाईन कमांड द्वारे असल्याने व त्या ठिकाणी काम करत असलेल्या उमेदवार तथा झिरो कर्मचाऱ्यांच्या हातामध्ये असल्याने सदरचे झिरो कर्मचारी हे नागरिकांची आर्थिक पिळवणूक करत आहेत. तसेच अव्वाच्या सव्वा रकमा घेऊनही मंजुरी देण्यास टाळाटाळ करत आहेत. परंतु काही दलाल व रेशन दुकानदार यांच्या माध्यमातून मोठमोठ्या रक्कम स्वीकारून त्याची कामे विनासायास व तातडीने करून देत आहेत.

यामुळे तालुक्यातील गोरगरीब दीनदलित, विधवा, निराधार, वयोवृद्ध महिला नागरिकांवर प्रचंड अन्याय होत आहे. सदरचे झिरो कर्मचारी हे अत्यंत उर्मटपणे नागरिकांची वर्तन करून त्यांची आर्थिक आणि मानसिक पिळवणूक करत आहेत.शिधापत्रिकेबाबत काम करण्याचे कोणतेही नियोजन नाही. जो जास्त पैसे देईल त्याचे काम तातडीने केले जाते यासारखे दुर्दैव नाही.

म्हणून पुरवठा शाखा इंदापूर येथील झिरो कर्मचारी तथा उमेदवार यांची कसून चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी. व पुरवठा शाखेतील त्यांना सामील असलेले पुरवठा निरीक्षक यांना पुरवठा शाखेच्या दरवाजासमोर बसून नागरिकांचा झिरो कर्मचाऱ्यांची संपर्क बंद करण्यात यावा. (इंदापूर तहसिलच्या अभिलेख कक्षामध्ये जी व्यवस्था करण्यात आली आहे.) त्याप्रमाणेच व्यवस्था पुरवठा शाखेमध्ये करण्यात यावी. अन्यथा या समस्येकडे शासनाचे गंभीरपणे लक्ष वेधण्यासाठी नाईलाज असतो संघटनेच्या वतीने आंदोलन केले जाईल असे पुणे जिल्हा लहुजी शक्ती सेना संघटनेचे अध्यक्ष दत्ताभाऊ जगताप यांनी सांगितले.


Post a Comment

أحدث أقدم