ईडब्लूएस प्रमाणपत्रासाठी 'इन्साफ'चा मुखेड तहसिल कार्यालयात ठिय्या आंदोलन
अडचणी दुर करुन प्रमाणपत्र देण्याचे तहसिलदारांनी दिले आश्वासन
मुखेड प्रतिनिधी / गुलाब शेख
तालुक्यातील अनेक सुशिक्षित मुस्लिम विद्यार्थी व विद्यार्थीनींनी तहसील कार्यालयाकडे सबळ पुराव्यानिशी आर्थिक दुर्बल घटक अर्थात ई.डब्लु.एस. प्रमाणपत्रासाठी आॅनलाईन अर्ज दाखल करुनही अनावश्यक बाबींचे कारण दाखवत तहसिल प्रशासनाकडुन प्रमाणपत्र देण्यासाठी टाळाटाळ होत असल्याने शुक्रवार दि.२ आॅगस्ट रोजी आॅल इंडिया तन्जीम ए इन्साफचे जिल्हाध्यक्ष रियाज शेख यांच्या नेतृत्वात तहसिलदार राजेश जाधव यांच्या कक्षात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसिलदार राजेश जाधव यांनी आंदोलनकर्त्यांना आश्वासित केले कि, आर्थिक दुर्बल घटकाच्या प्रमाणपत्र देण्यासंंबंधी ज्याकाही अडचणी होत्या त्या दुर करण्यात आल्या असुन नियमानुसार प्रमाणपत्र वितरीत करण्यात येतील.
सद्या केंद्र व राज्य शासनाने विविध विभागासाठी नौकर भरती सुरु केली आहे. त्यासाठी ई.डब्लु.एस. प्रमाणपत्रासाठी पात्र असलेल्या मुस्लिम अर्जदारांना आर्थिक दुर्बल घटाकाचे प्रमाणपत्रासाठी मुखेड तहसिल कार्यालयातील नायब तहसिलदार हे टाळाटाळ करत होते. म्हणुन आर्थिक दुर्बल घटकातील पात्र मुस्लिम अर्जदारांना तात्काळ प्रमाणपत्र देण्यात यावेळी यामागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. याआंदोलनास वंचित बहुजन आघाडीचे नेते फारुक अहमद, माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, माजी जि.प.अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, काँग्रेस प्रदेश सचिव डाॅ.श्रावण रॅपनवाड, शहराध्यक्ष हणमंत नारनाळीकर, माजी नगरसेवक राहुल लोहबंदे, वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष शंकर पा.श्रीरामे, ता. उपाध्यक्ष बबलु मुल्ला, शिवसेना शिंदे गटाचे अल्पसंख्याक विभागाचे तालुकाप्रमुख दिलावरसाब जाहूरकर, काँग्रेस अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष शौकत खान पठाण, युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष प्रा.अखिल येवतीकर, अबुल कलाम समितीचे अध्यक्ष एस.के.बबलु, आॅल इंडिया उलेमा बोर्डाचे तालुकाध्यक्ष सय्यद सुभानी, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुलेमान सलगरकर, सोशलमिडिया जिल्हाध्यक्ष शादुल होनवडजकर, टिपु सुलतान ब्रिगेड तालुकाध्यक्ष रफिक बामणीकर, राष्ट्रवादी अजितपवार गटाचे जयभीम सोनकांबळे, अन्याय-अत्याचार भ्रष्ट्राचार विरोधी समितीचे सैलानी शेख मुक्रमाबादकर आदींनी लेखी निवेदनाद्वारे आंदोलनास पाठिंबा दिला. यावेळी आॅल इंडिया तन्जीम ए इन्साफ, ई.डब्लू.एस. संघर्ष समितीचे सदस्यांसह तालुक्यातील असंख्य नागरिक सहभागी होते. आंदोलनाच्या पार्श्वभुमिवर सहा.पोलिस निरिक्षक रवी हुंडेकर, डिएसबीचे पांडुरुंग पाळेकर सह पोलिस प्रशासनाने चौख बंदोबस्त ठेवला होता.

إرسال تعليق