शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

डॉ. मणिभाई देसाई पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. राजेंद्र ज्ञानोबा कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त जि. प. प्राथमिक शाळा सहजपूर येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप.



 डॉ.  मणिभाई देसाई पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. राजेंद्र ज्ञानोबा कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त जि. प. प्राथमिक शाळा सहजपूर येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप.

प्रतिनिधी /धनंजय काळे, 

आज दिनांक 31/7/2024 रोजी मा. श्री राजेंद्र ज्ञानोबा कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सहजपूर ता.दौंड येथे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

 कार्यक्रमाची प्रस्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका  सौ.सुजाता कुदळे यांनी  केले.सदर साहित्यामध्ये मान्यवरांनी दप्तर, लेखन साहित्य, कंपास पेटी, दुरेघी, चौकटी, चार रेघी, अशा दोनशे पानी वह्या प्रत्येकी विद्यार्थ्यांसाठी वाटप केल्या सदर कार्यक्रम प्रसंगी डॉ. मणिभाई देसाई पतसंस्थेचे संचालक श्री. प्रवीण दरेकर यांच्या हस्ते साहित्याचे वाटप करण्यात आले, तदप्रसंगी श्री. लक्ष्मण हेंद्रे, श्री. जयवंत खासेराव दरेकर, श्री सुरेश थोरात ,श्री दत्तात्रय भैरवकर ,श्री विजय कुंजीर (शाखा व्यवस्थापक) श्री. शांताराम महाडिक, वसुली अधिकारी, श्री तानाजी बारंगुळे, श्री भगवान बोंगाळे. आदी मान्यवर उपस्थित होते सदर साहित्याचे वाटप करून मान्यवरांनी शाळेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

व शाळेच्या प्रगती विषयी समाधान व्यक्त केले. सदर प्रसंगी उपशिक्षिका श्रीम.नीता कुंजीर, सौ. बेबीताई खेडेकर, सौ. कोमल घोडके यांनीही मान्यवरांचे आभार मानले.

Post a Comment

أحدث أقدم