नेते भाजप सोडून शरद पवारांकडे जातायत की फडणवीस त्यांना पवारांकडे पाठवतायत
प्रतिनिधी / अतुल सोनकांबळे
1993 ला मुंबईमध्ये झालेल्या दंगलीनंतर राज्यात सत्तातंर होईल असंच काहीसं वातावरण होत.. त्यावेळी शरद पवार हे काँग्रेसमध्ये होते...आणि ते राज्याचे मुख्यमंत्रीदेखील होते.. त्यानानंतर 1995 साली महाराष्ट्रात निवडणुका घोषित झाल्या... त्यावेळी हवादेखील भाजपा आणि शिवसेनेचीच सुरू होती... मात्र निवडणुकीचा निकाल हाती आला अन् त्यावेळची भाजप शिवसेनेची युती बहुमतापासून दूर राहिली... युतीने त्यावेळी 138 जागा जिंकलेल्या होत्या... त्यावेळी युती बहुमतापासून दूर राहण्याचं सर्वात मोठं कारण होत ते म्हणजे अपक्ष आमदार... 1995 च्या निवडणुकीत तब्बल 45 अपक्ष आमदार निवडून आलेले होते.. आणि त्यातील बहुतांश आमदार हे शरद पवार समर्थक होते... त्यानानंतर या अपक्ष आमदारांना पवारांनी युतीला पाठिंबा द्यायला लावून या भाजप शिवसेना युतीच्या सरकारचा रिमोट मात्र त्यांनी आपल्या हातात ठेवला होता...
असं म्हणतात की या 45 अपक्ष आमदारांना शरद पवारांनीचं काँग्रेसऐवजी अपक्ष उभा केल होत.. हा सगळा घटनाक्रम आम्ही तुम्हला आताचं का सांगतोय.. तर सध्यादेखील असंच काहीसं वातावरण राज्याच्या राजकारणात सुरुय... मात्र त्यावेळी यामागचे मास्टरमाईंड शरद पवार होते... आता यामागील चाणक्य आहेत देवेंद्र फडणवीस... विधानसभा निवडणूक जवळ येताच अचानक फडणवीसांचे विश्वासू लोक अचानक शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करतायत... यामागे नेमकी शरद पवारांची पवारणीती आहे.. की देवेंद्र फडणवीसांची चाणक्यनीती..
परवा कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमधील समरजित घाडगे यांनी अचानकपणे तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला... तसं पाहिल्यास समरजीत सिंह घाडगे हे तसे पूर्वाश्रमीचे काँग्रेस राष्ट्रवादीचे मात्र 2016 साली त्यांनी भाजपमध्ये फडणवीसांचं नेतृत्व स्वीकारून प्रवेश केलेला होता... मात्र अजित पवारांनी कागल विधानसभेसाठी हसन मुश्रीफांचं नाव जाहीर केलं... अन् इकडे समरजित घाडगे हे मुंबईत देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन आले.. आणि लगेचच त्यांनी जयंत पाटलांसमोर शरद पवारांची तुतारी हाती घेणार असल्याचे जाहीर केलं.. मात्र धनंजय महाडिक सोडले तर भाजपच्या कोणत्याही बड्या नेत्यांनी समरजित घाडगेंना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला नाही...
आता इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील, मावळमधून बाळा भेगडे... माढ्यातून अभिजित पाटील तर पंढरपूरमधून माजी आमदार प्रशांत परिचारक ही फडणवीसांनी विश्वासू नेतेमंडळी सध्या शरद पवारांची तुतारी हातात घेणार असल्याची चर्चाय... मात्र सध्या भाजपची जी काय नेतेमंडळी शरद पवारांकडे जातीय.. त्यांचा सामना मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी होणार... त्यामुळे हे फडणवीसांचे समर्थक नेतेमंडळी शरद पवार हे आपल्याकडे घेतायत... की देवेंद्र फडणवीस मुद्दाम या नेत्यांना शरद पवारांकडे पाठवतायत अशी शंका सध्या व्यक्त होतीय... मात्र तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे सर्व करून देवेंद्र फडणवीस यांना काय मिळणार... त्यामुळेच आम्ही तुम्हाला 1995 सालच्या विधानसभा निवडणुकीचा किस्सा सुरुवातीला सांगितलेली होती.. की त्या निवडणुकीत कसे 45 अपक्ष आमदार निवडून आलेले होते.. अगदी तसाच गेम देवेंद्र फडणवीस सध्या खेळण्याच्या मूडमध्ये दिसताय तोही शरद पवारांसोबत... समजा उद्या जर महायुतीची सत्ता गेलीच तर सत्तेमध्ये आपली माणसे असावी अशी तर फडणवीसांची खेळी असावी अशी शक्यता व्यक्त होतीय... आणि ही भाजप सोडून जाणारी नेतेमंडळी नेमक्या अशाच मतदारसंघात शरद पवार गटात जात आहे.. जिथे राष्ट्रवादी अजित पवारांचा उमेदवार समोर उभा असणार आहे.. त्यामुळे नुकसान तर भाजपचं नक्कीच होणार नाहीये कारण जागा वाटपाच्या सूत्रानुसार सध्या अजित पवार गटाकडे 42 आमदार असून या 42 आमदारांच्या जागा अजित पवार या महायुतीत स्वतःकडे ठेवणार आहेत... त्यामुळे या 42 मतदारसंघांमध्ये भाजपकडून इच्छुक असलेल्या नेतेमंडळींना मात्र शांत बसावं लागणार होतं.. मात्र या 42 मतदार संघातल्या नेतेमंडळींनी शरद पवारांच्या रूपाने मात्र नवीन मार्ग शोधलेला आहे.. आणि त्याला फडणवीसांचा आशीर्वाद देखील असल्याचं राजकीय वर्तुळात बोलल जातय... त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे 1995 प्रमाणे आपल्या समर्थक आमदारांना जास्तीत जास्त निवडून आणून सत्तेचा रिमोट आपल्या हातात ठेवणार... की शरद पवार आणखी नवीन काहीतरी राजकीय गेम खेळून फडणवीसांचा हा गेम प्लॅन हाणून पाडणार... हा मात्र येणारा काळच ठरवणार आहे..


إرسال تعليق