शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

करमाळा पंचायत समितीच्या बिडीओ यांना जनशक्ती देणार होडी भेट



करमाळा पंचायत समितीच्या बिडीओ यांना जनशक्ती देणार होडी भेट

महाराष्ट्र प्रतिनिधि / धनंजय काळे

करमाळा पंचायत समिती कार्यालयाच्या आजूबाजूला अनेक सरकारी कार्यालये आहेत. त्या कार्यालयांना जाण्याच्या मार्गावर खूप मोठा खड्डा आहे. त्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचत असून संबंधित पाणी पुरवठा, लघु पाठबंधारे, भूमी अभिलेख, शिक्षण विभाग, महिला बालकल्याण विभाग या कार्यालयांना जाणाऱ्या अधिकारी आणि सर्व सामान्य जनतेला प्रचंड कसरत घ्यावी लागत असून याची तात्काळ दुरुस्ती करावी अन्यथा पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना होडी भेट देऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष अतुल खुपसे-पाटील यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.


 या निवेदनात पुढे म्हटले आहे की, करमाळा तालुक्यातील लाखो नागरिकांच्या ग्रामीण सुख सुविधेचं प्रमुख केंद्र म्हणजे पंचायत समिती कार्यालय आहे. आणि तालुक्याच्या कार्यालयाची अशी अवस्था असेल तर ही शरमेची बाब आहे आणि या घटनेची आपण तत्काल दखल घेऊन संबंधित भागावर आपण मुरूम भरून अधवा योग्य ती उपाय योजना करावी अन्यथा आम्ही जनशक्ती संघटनेच्या वतीने शुक्रवार दिनांक ६ सप्टेंबर २०२३ रोजी होडी भेट आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.


 यावेळी राणा वाघमारे, गणेश वायबसे, अतुल राऊत, रोहन नाईकनवरे, कल्याण गवळी, शरद एकाड, अक्षय देवडकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم