शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

माझा शेतकरी सुखी समृद्ध होऊ दे हिच गणराया चरणी प्रार्थना -अनिताताई खरात



माझा शेतकरी सुखी समृद्ध होऊ दे हिच गणराया चरणी प्रार्थना -अनिताताई खरात

इंदापूर प्रतिनिधी/ अतुल सोनकांबळे



आज इंदापूर मधील सर्व गणेश मंडळाला तेजपृथ्वी ग्रूपच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन बाप्पांची पूजा करून मोत्याचें हार गणेशाला  अर्पण केले, दरवर्षीप्रमाणे याही  वर्षी तेजपृथ्वी ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी इंदापूर मधील सर्व गणपतींना शेवटच्या दिवशी मोत्यांचे हार अर्पण केले, या वेळी तेजपृथ्वी ग्रूपच्या संस्थापक अध्यक्षा अनिता खरात म्हणाल्या की आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माझ्या इंदापूर मधील सर्व गणेश मंडळाला भेट दिली व बाप्पांचें आशीर्वाद घेतले व माझ्या शेतकऱ्याला ,युवकांना महिलांना सुखा समाधानाचे दिवस येऊ दे अशी प्रार्थना गणराया चरणी केली,तसेच  सर्व ठिकाणी मंडळातील भक्तांना आवाहन केले की आपण मिरवणूक काढताना आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी


 मिरवणूक शांततेत काढून ती लवकरात लवकर कशी विसर्जनाच्या जागेपर्यंत नेता येईल याची मंडळातील प्रमुख कार्यकर्त्यांनी खबरदारी घ्यावी तसेच आपल्यामुळे इतर मंडळांना किंवा मुलींना लहान बालकांना महिलांना त्रास होईल असे वागू नये व पोलीस बांधवांनी दिलेल्या सूचनांचे ही पालन करावे अशे गणेश भक्तांना आवाहन केले यावेळी सर्व गणेश भक्तांनी माझा व पदाधिकाऱ्यांचा अतिशय आनंदात मानसन्मान केला त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार .

Post a Comment

أحدث أقدم