राष्ट्रीय सेवा योजना उद्घाटन कार्यक्रम संपन्न
डीसीएम सोसायटीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे कला महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना उद्घाटन कार्यक्रम 24 सप्टेंबर 2024 रोजी राष्ट्रीय सेवा योजनेचे औचित साधून राष्ट्रीय सेवा उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रम साठी प्रमुख पाहुणे उद्घाटक समर्थक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय उमेश गीते साहेब उपस्थित होते या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना ,सायबर क्राईम या विषयावरती सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्ययस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य मा. डॉ.भारती सहस्रबुद्धे मॅडम उपस्थित होत्या. त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना विषयी सखोल मार्गदर्शन मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती पोलीस उप निरीक्षक अक्षय घोरवड, मा. खेतट साहेब उप प्राचार्य डॉ. नरेश पोटे राष्ट्रीय सेवा योजना डॉ.प्रवीण कांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी मार्गदर्शन व संपूर्ण सहकार्य डीसीएम सोसायटी ऑफ इंडियाचे जनरल सेक्रेटरी माननीय विशाल भाऊ शेवाळे साहेब यांनी केले. त्यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पर्वतराव बैसाणे सर यांनी केले प्रास्ताविक डॉ. प्रवीण कांबळे यांनी केले आभार प्रा.सौ अरुणा मुडावत मॅडम यांनी केले
إرسال تعليق