मोहाडी परिसरातून अजगर पकडला वन्यजीव रक्षकांनी सोडला वनक्षेत्रात
महाराष्ट्र पोलीस 24 न्यूज
धुळे तालुका प्रतिनिधी संकेत बागरेचा नेर
मोहाडी उपनगर परिसरात भला मोठा अजगर आढळला आहे त्या ठिकाणी उत्तर महाराष्ट्र सर्प मित्र टीमच्या एका सर्प मित्राने त्या ठिकाणी जाऊन त्या अजगराला सुरक्षित रित्या पकडण्यात आले.
तात्काळ त्याला सायंकाळी वन्यजीव क्षेत्रात सोडण्यात आले. अजगर हा जगंलातला प्राणी आहे परंतु काही महिन्यापासून धुळे शहरात मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे याचे कारण नागरिक सापाला न मारता खूप मोठे सहकार्य करत आहेत ही वन्यजीव रक्षक यांच्या साठी आनंदाची गोस्ट आहे. ह्या ठिकाणी सर्प तज्ञ निर्भय सखला यांनी धुळेकर नागरिकांचे आभार मानले आहे व असेच कायम सहकार्य करतील ही अपेक्षा असेल असे आवाहन केले आहे.
या ठिकाणी उपस्थित सर्पतज्ञ निर्भय साखला, सर्पमित्र वन्यजीव रक्षक सनी सोनवणे, सर्पमित्र मयूर गवळी, सर्व मित्र सुमित पाखरे आदी उपस्थित होते.

إرسال تعليق