आंबेगाव तालुक्यामध्ये गोरगरीब जनतेची महावितरण कंपनी द्वारा होत आहे खुलेआम लूट-पंकज भाऊराव सरोदे_
महाराष्ट्र पोलीस न्यूज 24
प्रतिनिधी रंजित दुपारगुडे
पुणे जिल्हा, आंबेगाव तालुक्यामध्ये लाईट बिलचा प्रभाव जास्तच वाढत आहे अशी तक्रार आंबेगाव तालुक्यातून जनतेने वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन चे आंबेगाव तालुका अध्यक्ष पंकज भाऊराव सरोदे यांना करण्यात आले, आंबेगाव तालुक्यातील गोरगरीब शेतकरी जनता यांची लाईट बिल द्वारा संपूर्णपणे लूट होत आहे, घराचे महिन्याचे भाडे पेक्षा जास्त लाईट बिल हा येतो, असं निदर्शनास आल्यावर कळले की खाजगी कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट बेस वर मीटर रीडिंग घेण्यासाठी नेमणूक केलेले कर्मचारी यांना कुठल्याही प्रकारचा पगार नसून प्रत्येक रेडींग मागे काही किंमत ठरवली आहे जेणेकरून जेवढे जास्त रीडिंग आणाल तेवढे जास्त पैसा मिळेल याकरिता जास्तीत जास्त रीडिंग आणण्यासाठी आंबेगाव तालुक्यातले नसून इतर तालुक्यातून कर्मचारी कामासाठी ठेवले असून, आंबेगाव तालुक्यातील जनतेला भरमसाठ बिल येत आहे, व विचारल्यावर रीडिंग घेणारी माणसं उद्धटपणे भाषा करून विषय टाळाटाळ करत असतात, आंबेगाव तालुक्यामध्ये शासकीय कर्मचारी यांनीच रीडिंग घ्यावा अशी आमची प्रमुख मागणी आहे व कोणत्याही थर्ड पार्टीला हस्तक्षेप करू नये कारण आंबेगाव तालुक्यात जनतेला थर्ड पार्टीवर विश्वास हा राहिला नाही,
जनतेची जास्त प्रमाणात बिल येऊन फसवणूक केली जात आहे याची आपण दक्षता घ्यावी व प्रमुख मागण्याला आपण विचार करावा व खाजगी नसून सरकारी कर्मचारींनी येऊन रीडिंग घ्यावं व होणारी लूट ही थांबवण्यात यावी, आपण आमच्या प्रमुख मागणी मान्य करून रीतसर सरकारी कर्मचाऱ्यांना रीडिंग घेण्यासाठी अधिकार देण्यात यावे, अशी मागणी मा.शैलेश गीते (उपकार्यकारी अभियंता मंचर विभाग) येथे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे आंबेगाव तालुका अध्यक्ष मा.पंकज भाऊराव सरोदे यांनी केले व सोबत मा.शिवाजी राजगुरू (तालुका अध्यक्ष), मा.नफीस भाई शेख (तालुका उपाध्यक्ष), ऍड. रंजीत भाई यादव (तालुका उपाध्यक्ष), मा.फकीरा देठे, मा.अक्षय शिंदे.


إرسال تعليق