मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षण उपोषण समर्थनात नायगाव बाजार आज सकाळपासूनच कडकडीत बंद..
महाराष्ट्र पोलीस न्यूज 24
नायगाव प्ररतिनिधी : रघुनाथ सोनकांबळे
मराठा योद्धा मनोज रंगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून लढा सुरू केला पण शासन दरबारी मराठा आरक्षण संदर्भात कुठलीच भूमिका स्पष्ट होत नसल्याने पुन्हा जरांगे पाटील अंतरवली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले असून आज त्यांच्या उपोषण समर्थनात दिनांक 23 सप्टेंबर रोजी नांदेड जिल्हा बंदची हाक देण्यात आली
या बंदमध्ये नायगाव बाजार येथील सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते सामील होऊन नायगाव बंदची यांनीही हाक दिली असता शहरातील सर्व प्रतिष्ठान लहान मोठे व्यापारी कापड दुकान किराणा दुकान सर्व रोज उदरनिर्वाह करून आपली रोजंदारी कमावणारे सुद्धा या बंदमध्ये स्वतःहून सहभागी झाले असून त्यांनीही आपले या बंदला समर्थन देत हजारो कार्यकर्ते रस्त्यावर ठिय्या मांडून बसले आहेत.
तर या बंदच्या दरम्यान कुठल्याही आमचीच प्रकार घडू नये म्हणून नायगाव पोलीस स्टेशनच्या वतीने येथील पोलीस निरीक्षक कुंभार यांनी मोठा चौक पोलिस बंदोबस्त लावला आहे..



إرسال تعليق