शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

लाडक्या बहिणीच्या खात्यावरून कपात झालेले पैसे पुन्हा मिळणार आरपीआयच्या पाठपुराव्याला यश : बाळासाहेब सरवदे



लाडक्या बहिणीच्या खात्यावरून कपात झालेले पैसे पुन्हा मिळणार 
आरपीआयच्या पाठपुराव्याला यश  : बाळासाहेब सरवदे 


इंदापूर प्रतिनिधी /अतुल सोनकांबळे 

महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार या योजनेंतर्गत जमा केलेला निधी कोणत्याही कर्जाच्या परतफेडीसाठी किंवा कोणत्याही शुल्क आकारणी वसुलीसाठी केला जाऊ नये. तरीही काही बॅंकांनी लाडक्या बहिणीच्या खात्यातून परस्पर रक्कम वळती केली होती. त्याअनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यस्तरीय समितीने राज्यभरातील सर्वच बॅंकांना या योजनेंतर्गत जमा केलेला निधी कोणत्याही कर्जाच्या परतफेडीसाठी किंवा जमा झालेल्या शुल्काच्या वसुलीसाठी केला जाऊ नये. अशा आशयाचे आदेश देण्यात आले आहेत. 


   महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यात "मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना" लागू केली आहे. या योजनेअंतर्गत २१ ते ६० वर्षे वयोगटातील महिलांना मासिक दिड हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यासाठी योजना आखली आहे. ही योजना १ जुलै २०२४ रोजी सुरू करण्यात आली होती, त्यानुसार जुलै आणि ऑगस्ट २०२४ या महिन्यांचा पहिला हप्ता १४ ते १६ ऑगस्ट २०२४ दरम्यान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. परंतु काही बॅंकांच्या धोरणानुसार लाभार्थी महिलांच्या खात्यातून ही रक्कम परस्पर वळती करून घेतली होती. त्यामुळे अनेक महिलांना बॅंकेतून रिकाम्या हाताने परत यावे लागले होते. यासंदर्भात इंदापुर तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे इंदापुर तालुकाध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांनी मुख्यमंत्र्यांसह सर्व संबंधितांना पत्रव्यवहार करून कैफियत मांडली होती. 

   यासंदर्भात पत्रकारांशी संवाद साधताना सरवदे म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने गोरगरीब कष्टकरी महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली आहे. "भावानं दिलं मात्र बॅंकेने नेलं" अशी परिस्थिती झाली होती. बऱ्याच भगिनींच्या खात्यातून परस्पर रक्कम वळती करून घेतली होती. त्यामुळे महिला भगिनी मध्ये संताप अनावर झाला होता. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांसह सर्व संबंधितांना पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार महाराष्ट्र राज्य बॅंकर्स समितीने संबंधित बॅंकांना सुचना देऊन परस्पर वळती केलेली जुलै व ऑगस्ट महिन्याची रक्कम तात्काळ परत खात्यावर जमा करण्याचे आदेश दिले आहेत. व ज्या महिलांच्या खात्यातून बॅंकांनी परस्पर रक्कम वळती करून घेतली आहे, अशा महिलांनी संबंधित बॅंकेशी संपर्क साधावा असे आवाहन सरवदे यांनी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم