शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

नेर येथुन 16 लाखांचा गुटखा जप्त

सकेत बगरेचा
धुळ जिल्हा प्रतिनिधी 
           धुळे- तालुक्यातील नेर येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने शिताफीने छापा टाकुन १६ लाख ३८ हजार ९५० रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त केला आहे. या कारवाईने चांगलीच खळबळ माजली आहे.

           पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी गुटखा, अवैध दारु, गावठी हातभट्टी व इतर अवैध धंदे यांचेवर छापे टाकुन कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार दि. २५ ऑक्टोंबर २०२४ रोजी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनीय बातनी मिळाली की, नेर ता. जि. धुळे येथील जुना सुरत रस्त्यावर सागर वसंत अहिरे रा. वाडीभोकर रोड देवपुर धुळेया इसमाने एका पत्रटी शेडमध्ये

            महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला विमल पानमसाला गुटखा विक्री करण्याच्या उद्देशाने बेकायदेशिररित्या साठा केला आहे. त्याअनुषंगाने पथक तयार करून कारवाई करण्याचे निर्देश दिले असता, नेर ता. जि. धुळे येथे जुना सुरत रोड येथे सागर वसंत अहिरे रा. वाडीभोकर रोड देवपुर धुळे याचे पत्र्याच्या शेड मध्ये ७ लाख ८५ हजार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई ४०० किंमतीचे केसर-युक्त विमल पान मसाला चे एकुण २१ गोण्या, ३४ हजार ६५०/- रु.कि.चे १ तंबाखुच्या एकुण २१ गोण्या, २लाख १७ हजार ८०० रु. किं. चे केसर-युक्त विमल पान मसाला चे एकुण विमल पान मसाला चे एकुण ०५ गोण्या व ११००/- रु.कि. चे तंबाखुच्या एकुण ०५ गोण्या ६ लाखांचे बोलेरो वाहन क्रमांक एम. एच.-३९ बी-२८१२ मिळुन आले.                          घटनास्थळाचा पंचनामा करून घटनास्थळावरुन एकुण १६ लाख ३८ हजार ९५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल आहे. सदर कारवाई बाबत सहायक रुपये आयुक्त, अन्न व औषधी प्रशासन विभाग, धुळे यांना पुढील कारवाई करणेबाबत लेखी रिपोर्ट देण्यात आला असुन, धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, सपोनि श्रीकृष्ण पारधी, पोहेकॉ. संदिप पाटील, पोहेकॉ. नायुस सोनवणे, पोहेकॉ. शशिकांत देवरे, पोहेकॉ. पंकज खैरमोडे, चापोहेकॉ. संजय सुरसे पोकॉ. किशोर पाटील, पोकॉ. योगेश जगताप, पोकॉ. मयुर पाटील अशांनी केली आहे.

Post a Comment

أحدث أقدم