शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

यशवंत इंग्लिश मिडीयम स्कूल येथे विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय आनापान सती शिबिराचे आयोजन

         


        संकेत बागेचा
    धुळे जिल्हा प्रतिनिधी 
       नेर - येथील यशवंत इंग्लिश मिडीयम स्कूल येथे विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय आनापान सती शिबिराचे
आयोजन करण्यात आले होते. बालशिबिराचे प्रदीर्घ अनुभव असलेले श्री हरीश खेमानी सर यांनी यावेळी विद्यार्थ्यांना आनापान सतीचे प्रशिक्षण दिले . तसेच विद्यार्थी दशेत असताना आनापान साधनेचे महत्त्वही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले . आनापान साधनेमुळे विद्यार्थ्यांचे चित्त एकाग्र तर होतेच शिवाय चित्त स्थिरतेमुळे विद्यार्थ्यांची निर्णय क्षमता, समायोजन क्षमता देखील वाढते तसेच मानसिक आरोग्याची गुरुकिल्ली म्हणून ध्यान साधनेचा उपयोग होतो ज्यामुळे व्यक्ती संकटाच्या परिस्थितीतही मन आणि मेंदू शांत ठेवून मार्ग काढतात. 
          आनापन सती साधनेचे हे दृढ फायदे लक्षात घेऊनच आपल्या शाळेने परीक्षा पूर्व तयारी म्हणून विद्यार्थ्यांसाठी या शिबिराचे आयोजन केले होते. कारण परीक्षेपूर्वी सर्वच पालक , शिक्षक विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आग्रह धरत असतात. मात्र परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना भीती वाटतच असते . त्यामुळे बऱ्याचदा अभ्यास होऊनही विद्यार्थी परीक्षेत लक्ष केंद्रित करू शकत नाही. त्यामुळे अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांच्या मानसिकतेची पुष्टी करण्याच्या हेतूने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शाळेत दररोज विद्यार्थ्यांना दहा मिनिटे आनापान साठी बसवले जाते. तसेच यापुढे नियमितपणे विद्यार्थ्यांसाठी असे एक दिवसीय शिबीर आयोजित केले जाईल असे आश्वासन संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री नानासाहेब पगारे सर यांनी केले

Post a Comment

أحدث أقدم